धक्कादायक ! CRPF जवानाची गोळी झाडून आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लिहिलं ‘हे’ कारण

गडचिरोली : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानाने बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना भामरागड तालुक्यातील लाहेरी उपपोलीस ठाण्यात रविवारी (दि.26) ऐन अक्षय्य तृतीयेच्या दिवशी घडली. दीपक कुमार (वय-27) असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव आहे. दीपक कुमार हे मुळचे उत्तराखंड राज्यातील रहिवासी असून अचानक घडलेल्या या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

दीपक कुमार हे केंद्रीय राखीव दलाच्या बाटलियन क्रमांक 37 मध्ये कार्यरत होते. त्यांनी स्वत: कडील बंदुकीतून आपल्या छातीत गोळी घालून आत्महत्या केली. दीपक कुमार यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. पोलिसांनी ती चिठ्ठी ताब्यात घेतली आहे. त्यामध्ये दीपक कुमार यांनी आत्महत्येचे कारण लिहिलं आहे. वैयक्तिक कारणांमुळे आत्महत्या करत असल्याचे त्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. दीपक कुमार यांचा मृतदेह हेलिकॉप्टरने गडचिरोलीमध्ये आणण्यात आला असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

दरम्यान, मागील 15 दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे पोलीस उपनिरीक्षकाने स्वत:च्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने गोळी झाडून आत्महत्या केली. अजहर शेख असं या पोलीस अधिकाऱ्याचे नाव असून त्यांनी पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंग यांच्या मागलेगाव दौऱ्या असताना आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.