जवानाच्या पत्नीला महागात पडला ‘आशिकी’चा डाव, प्रेमाच्या त्रिकोणामुळं झाला ‘मर्डर’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : सीआरपीएफ जवानाच्या पत्नीने घरगुती भांडणाला कंटाळून पतीला सोडले तेव्हा तिने बेकायदेशीर संबंधांकडे आपले पाऊल टाकले. सुरुवातीला ती महिला एका बस ड्रायव्हरच्या प्रेमात पडली आणि जेव्हा त्याचा अपघात झाला तेव्हा ती तिच्या ऑफिसमधील सहकाऱ्याच्या प्रेमात पडली. बस ड्रायव्हरने जेव्हा त्या महिलेस लग्न करण्याचा प्रस्ताव दिला तेव्हा महिलेने नकार दिला. यानंतर जे घडले ती फार धक्कादायक घटना होती. हे प्रकरण उत्तर प्रदेशमधील कानपूरचे आहे.

कानपुर येथील चौबेपूर पोलिस स्टेशनच्या तातियागंज येथे आपल्या माहेरी राहणाऱ्या सीआरपीएफ जवानाची पत्नी आराधना हिची तिच्याच बस चालक मित्राने हत्या केली. किदवई नगर येथील आराधना च्या कार्यालयाबाहेर त्याने तिला दुचाकीवर नेले आणि कल्याणपूरच्या बारहसिरोही येथे तार च्या साहाय्याने गळा आवळून खून केला. एसएसपीच्या स्वाट पथकाने आरोपी बस चालकास अटक केली आणि गुरुवारी या प्रकरणाचा खुलासा मीडियासमोर केला.

एसपी अपर्णा गुप्ता यांनी सांगितले की, मृतक आराधनाला तिच्या सीआरपीएफ जवान असणाऱ्या पतीने घरगुती भांडणाला कंटाळून सोडले होते. त्याच वेळी, घरून ऑफिसला जात असताना तिची बस ड्रायव्हरशी मैत्री झाली होती.

त्यांच्या मैत्रीचे हळूहळू प्रेमात रूपांतर झाले. या दरम्यान बसचालकाचा अपघात झाला. अपघातातील उपचारादरम्यान बसचालक आपल्या घरी काही दिवसांसाठी आराम करत होता.

यादरम्यान मृतक महिलेचे कार्यालयातील एका सहकाऱ्याशी संबंध जुळून आले. इकडे बस ड्रायव्हरने बरे झाल्यावर मृतक महिलेशी लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला, त्या महिलेने त्याच्या या प्रस्तावास नाकारले यानंतर बस चालकाच्या हातून आराधनाचा खून झाला.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/