खुशखबर ! ‘या’ कारणामुळं दिवाळीपर्यंत 3 ते 5 रूपयांपर्यंत स्वस्त होऊ शकतं पेट्रोल आणि डिझेल, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पेट्रोल आणि डिझेलच्या भाव सध्या कमी होताना दिसत आहे. याचे कारण आहे कच्च्या तेलाच्या कमी होणाऱ्या किंमती. यामुळे इंधनाच्या किंमतीत एक रुपया प्रति लीटर कपात पाहायला मिळाली आहे. आठवड्यापूर्वी सौदी अरामकोच्या तेल संयंत्रणांवर हल्ला झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर इंधनाच्या किंमती एकदम 20 टक्क्यांनी वाढल्या. त्यानंतर आता इंधनाच्या किंमती आटोक्यात येण्यास सुरुवात झाली आहे. सध्याच्या स्थितीला कच्च्या तेलाच्या किंमती 60 डॉलर प्रति बॅरलच्या खाली आल्या आहे. जर अशा प्रकारे कपात सुरु राहिली तर दिवाळीपर्यंत पेट्रोल डिझेलच्या किंमतीत 3 ते 5 रुपयांची कपात होईल.

आज कच्च्या तेलाच्या भावात 0.43 टक्के कपातीनंतर 58.12 डॉलर प्रति बॅरलवर व्यापार सुरु होता. डब्ल्यूटीआयच्या नोव्हेंबर डिलिव्हरी अनुबंधात 0.28 टक्क्यांच्या कपातीबरोबर 52.80 डॉलर प्रति बॅरेलचा व्यापार चालू होता. जागतिक आर्थिक मंदीची शक्यता असल्याने तेलाच्या भावात कपात होताना दिसत आहे.

14 डॉलर प्रति बॅरल कमी झाले दर
14 सप्टेंबरला सौदी अरेबियाच्या तेल कंपनी असलेल्या सौदी अरामकोवर ड्रोन हल्ला झाला होता. त्यानंतर 16 सप्टेंबरपासून जागतिक बाजारात तेलाच्या किंमतीत 28 वर्षानंतरची सर्वात मोठी एक दिवसीय वाढ पाहायला मिळाली. तेव्हा ब्रेंट क्रूडचा भाव 71.95 डॉलर प्रति बॅरल झाला. परंतू त्यानंतर आतापर्यंत ब्रेंटचा भाव जवळपास 14 डॉलर प्रति बॅरलपर्यंत कमी झाला आहे.

3 ते 5 रुपये स्वस्त होऊ शकते पेट्रोल डिझेल
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार कच्च्या तेलाचे भाव कमी झाल्याने पेट्रोल डिझेलच्या भावात कपात होईल. एंजेल ब्रोकिंग रिसर्चचे डेप्युटी डायरेक्टर अनुज गुप्ता यांनी सांगितले की इंटरनॅशनल मार्केटमध्ये कच्च्या तेलाच्या भावावर दबाव आला आहे. त्याला कारण आहे व्यापार युद्ध आणि आर्थिक मंदी. त्यामुळे कच्चा तेलाच्या किंमतीत कपात होत आहे. त्यामुळे इंधनात कपात होत आहे. ते म्हणाले की दिवाळीपर्यंत पेट्रोल डिझेलचे दर 3 ते 5 रुपये कमी होऊ शकतात.

Visit : Policenama.com