भारतात कच्चे तेल 10.51 रुपये लिटर, कधी घसरतील ‘पेट्रोल-डिझेल’चे दर ?

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था – कोरोनाच्या कहरने तेल बाजार उद्ध्वस्त झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत बुधवारी 18 वर्षाच्या नीचांकावर घसरली आहे, तर भारतीय वायदा बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 1,672 रुपये म्हणजेच 10.51 रुपये प्रतिलिटरने कमी झाली आहे. त्यामुळे आता येत्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये आणखी घट होईल अशी आशा लोकांकडून व्यक्त होत आहेत.

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स) वर रात्री 10.03 वाजता कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 400 रुपयाने घसरुन म्हणजेच 190 .9 टक्क्यांनी कमी झाली होती. मागील सत्रात ती प्रति बॅरल 1,672 रुपये होती. एका बॅरेलमध्ये 159 लिटर क्रूड तेल असते. अशाप्रकारे, देशात एक लिटर कच्च्या तेलाची किंमत 10.51 रुपये असेल.

इंटरकॉन्टिनेंटल एक्सचेंज (आयसीई) वर ब्रेन्ट क्रूडचा मे कॉन्ट्रॅक्ट मागील सत्रात 3.21 डॉलर म्हणजेच 11.17 टक्क्याने घसरण होऊन 25.52 प्रति बॅरलवर होता, तर ब्रेंटच्या किंमती 25.33 डॉलर प्रति बॅरलपर्यंत खाली आल्या आहेत. 2003 नंतरचा हा उच्चांक आहे जो सगळ्यात खालचा स्तर आहे.

न्यूयार्क मर्के टाइल एक्सचेंज (नायमॅक्स) वर वेस्ट टेक्सॉस इंटरमीडिएट (डब्ल्यूटीआय) चा भाव 4.47 डॉलर म्हणजेच 16.३6 टक्क्यांनी घसरून 22.86 डॉलर प्रति बॅरलवर आला होता, तर डब्ल्यूटीआय 22.59 डॉलर प्रति बॅरलवर आला होता. बाजारातील तज्ज्ञांनी सांगितले की, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यामुळे कच्च्या तेलाची मागणी कमी झाली आहे आणि तेलाच्या बाजारभावावरील किंमतीतील भावही कमी झाले आहे.