… म्हणून भारतात स्वस्त होणार पेट्रोल-डिझेल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये मंगळवारी मोठी घसरण झाली. कच्चे तेल जून 2020 च्या नंतर प्रथमच 40 डॉलर प्रति बॅरलच्या खाली गेले. तर, अमेरिकेच्या कच्च्या तेलाची किंमत सुद्धा 8 टक्केपेक्षा जास्त कमी झाली आहे. सोमवारी सौदी अरबने संपूर्ण जगात कोरोना व्हायरसच्या पॉझिटिव्ह प्रकरणांची संख्या वाढत असताना ऑक्टोबरसाठी कच्च्या तेलाच्या विक्री किमतीमध्ये घट करण्याची घोषणा केली होती. यानंतर मंगळवारी कच्च्या तेलाच्या किंमती 40 डॉलरच्या खाली गेल्या. एक्सपर्टचे म्हणणे आहे की, याचा थेट फायदा भारतासारख्या अर्थव्यवस्थेला मिळेल. एक तर कच्च्या तेलाच्या इम्पोर्टवर खर्च घटेल. तर, घरगुती बाजारात पेट्रोल-डिझेलच्या किमतीत घसरण झाली.

अमेरिकेच्या क्रूडमध्ये 3.42 डॉलरची घसरण
भारत, ब्रिटन, स्पेन आणि अमेरिकेच्या काही भागात कोरोना व्हायरसच्या पॉझिटिव्ह प्रकरणांची संख्या लागोपाठ वाढत आहे. सरकार अनेक महिन्यांपासून कोरोनावर नियंत्रणात मिळवू शकलेले नाही. यामुळे जागतिक अर्थव्यवस्था सतत कमजोर होत आहे. अशातच कच्च्या तेलाची मागणी सुद्धा खालच्या स्तरावर कायम आहे. अमेरिकेच्या डब्ल्यूटीआय क्रूडच्या किंमतीत मंगळवारी 3.42 डॉलर प्रति बॅरलची घसरण नोंदली गेली, जी एक दिवसात दरापेक्षा 8.6 टक्के कमी आहे.

ब्रेंट क्रूड ऑईलची किंमत 39.55 डॉलर प्रति बॅरल
अमेरिकन क्रूड ऑईलच्या किंमती 15 जूनच्या नंतर मंगळवारी खालच्या स्तरावर पोहचल्या. तर, ब्रेंट क्रूड ऑईलच्या किमतीत 5.9 टक्केची घसरण नोंदली गेली. ब्रेंट क्रूडच्या किंमतीत मंगळवारी 2.46 डॉलर घसरून 39.55 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले. किमतीच्या प्रकरणात दोन्ही ऑईल बेंचमार्क ऑगस्टच्या किमतीच्या खाली आले. ब्रेंट क्रूडच्या किमतीमध्ये लागोपाठ पाचव्या दिवशी घसरण नोंदली गेली.

घसरणीनंतर सुद्धा कच्च्या तेलाच्या किमतीत सुधारणा
अरामकोने मागणी कमी असल्याने ऑक्टोबरसाठी अरब लाईट ऑइलच्या किंमतीमध्ये कपात केली आहे. कोलाराडोच्या पीके वर्लगर एलएलसीच्या एनर्जी अ‍ॅनालिस्ट फिलचे म्हणणे आहे की, सौदीने तेलाच्या किंमतीत कपात केल्याने अमेरिकेचे डब्ल्यूटीआय क्रूड खरेदी करण्यात आशियाई खरेदीदार रस दाखवत नाहीत. मात्र, इतक्या कमी किंमतीनंतर सुद्धा एप्रिलच्या तुलनेत कच्च्या तेलाच्या दरात चांगली सुधारणा झाली आहे. तेल निर्यातक देशांची संघटना ओपेक प्लसने तेल पुरवठ्यात कपातीचे निर्देश दिले होते. आता 17 सप्टेंबरला ओपेक प्लसची बैठक आहे, ज्यामध्ये तेल बाजाराचे पनरावलोकन केले जाईल.