Crude Palm Oil | दिलासादायक ! मोदी सरकारने कच्च्या पामतेलवर कस्टम ड्यूटी कमी केली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Crude Palm Oil | खाद्यतेलाच्या वाढत्या किमती कमी करण्यासाठी मोदी सरकारने (Modi Government) मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने शनिवारी क्रूड पाम तेल किंवा सीपीओवरील प्रभावी कस्टम ड्युटी 5.5 टक्के कमी केली. या निर्णयामुळे खाद्यतेलाच्या किमती कमी होण्यास मदत होणार असून ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. (Crude Palm Oil)

 

एका अधिकृत नोटीफिकेशनमध्ये शनिवारी सांगण्यात आले की, आता 5 टक्के कृषी पायाभूत सुविधा विकास उपकर कच्च्या पाम तेलावर लावला जाईल, जो आतापर्यंत 7.5 टक्के होता. या कपातीनंतर क्रूड पाम तेलावरील प्रभावी कस्टम ड्युटी 8.25 टक्क्यांऐवजी 5.5 टक्के होईल.

 

ऑक्टोबर 2021 मध्ये खाद्यतेलाच्या आयात शुल्कात कपात करण्यात आली होती
या कपातीमुळे भाव 280 रुपये प्रति क्विंटलने खाली येण्याची शक्यता व्यापार्‍यांनी व्यक्त केली. सरकारने यापूर्वी ऑक्टोबर 2021 मध्येही खाद्यतेलाच्या आयात शुल्कात कपात केली होती. भारत आपल्या खाद्यतेलाच्या 60 टक्क्यांहून अधिक गरज आयातीद्वारे भागवतो. इंडोनेशिया आणि मलेशिया हे भारताला आरबीडी पामोलिन आणि क्रूड पाम तेलाचे प्रमुख पुरवठादार आहेत. (Crude Palm Oil)

 

शनिवारी बाजारातील घाऊक भाव पुढीलप्रमाणे होते – (रु. प्रति क्विंटल)

मोहरी तेलबिया – 8350-8380 (42 टक्के स्थिती किंमत) रु.

भुईमूग – 5,825 – 5,920 रुपये.

भुईमूग तेल मिल डिलिव्हरी (गुजरात) – रु. 12,900

भुईमूग सॉल्व्हेंट रिफाइंड ऑइल 2050 – रु. 2,175 प्रति टिन

मोहरीचे तेल दादरी – 16,600 रुपये प्रति क्विंटल

मोहरी पक्की घाणी – 2450-2500 रुपये प्रति टिन

मोहरी कच्ची घाणी – 2650-2745 रुपये प्रति टिन

तीळ तेल मिल डिलिव्हरी – रु. 16,700-18,200

सोयाबीन ऑइल मिल डिलिव्हरी दिल्ली – रु. 14,100

सोयाबीन मिल डिलिव्हरी इंदूर – रु. 13,850

सोयाबीन तेल डेगम, कांडला – 12,700

सीपीओ एक्स – कांडला – रु. 12,150

बिनोला मिल डिलिव्हरी (हरियाणा) – रु. 12,950

पामोलिन आरबीडी, दिल्ली – 13,600 रु.

पामोलिन एक्स- कांडला – 12,500 (जीएसटी शिवाय)

सोयाबीन दाणा – 6750-6800

सोयाबीन लूज – 6550-6690 रु.

मक्का खल (सारिस्का) – 4,000 रु.

 

Web Title :- Crude Palm Oil | Modi government cuts custom duty on crude palm oil

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा