पतीला पाठवली दुसर्‍या व्यक्तीसोबतची नग्न छायाचित्रे, नंतर केली हुंड्यासाठी छळाची तक्रार; सुप्रीम कोर्टाचे महिलेला समर्थन, म्हटले- निर्दयी माणूस दयेच्या लायक नसतो

नवी दिली : वृत्त संस्था – चीफ जस्टिस ऑफ इंडिया एस. ए. बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील सुप्रीम कोर्टाच्या बेंचने शुक्रवारी हुंड्यासाठी छळ केल्याच्या प्रकरणातील आरोपी पतीचा अटकपूर्व जामीन हे सांगत फेटाळला की, निर्दयी माणसं दयेच्या लायक नसतात. विशेष म्हणजे ही महिला एका दुसर्‍या व्यक्तीसोबत राहात होती आणि त्या व्यक्तीसोबतची तिची शेकडो नग्न छायाचित्रे तिने पतीला पाठवली होती. यामुळे पतीला जामीन मिळण्याची मोठी अपेक्षा होती.

सुप्रीम कोर्टाची ही टिप्पणी यासाठी सुद्धा महत्वपूर्ण आहे कारण या केसमध्ये पतीची केस मजबूत होती आणि अपेक्षा होती की, त्यास जामीन मिळेल. मात्र, सीजेआय यांच्या अध्यक्षतेखालील बेंचने प्रकरणात पूर्णपणे महिलेच्या आरोपांना समर्थन दिले.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, पतीने दावा केला होता की, त्याच्या पत्नीने त्याच्यापासून वेगळे राहात दुसर्‍या व्यक्तीसोबतची आपली नग्न छायाचित्रे पाठवली होती. यावरून करण्यात आलेल्या पोलीस तक्रारीनंतर उत्तरदाखल पत्नीने त्याच्यावर हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप केला होता.

पतीच्या वकिलाने सांगितले की, महिला जेव्हा पतीपासून वेगळी राहात होती तेव्हा त्या दरम्यान तिने दुसर्‍या व्यक्तीसोबतची शेकडो छायाचित्रे पाठवली. यानंतर तिने हुंड्यासाठी छळ केल्याचा सुद्धा आरोप केला, उलट हुंडा म्हणून एक रूपयासुद्धा घेतला गेला नव्हता आणि मागितला नव्हता. वकिलाने सांगितले की, महिलेचा आरोप एकतर्फी आहे.

सुप्रीम कोर्टाच्या बेंचने पतीचा अटकपूर्व जामीन हे सांगत फेटाळला की, जर महिलेने एखाद्या दुसर्‍या व्यक्तीसोबतची नग्न छायाचित्रे शेयर केली तर तुम्ही तिला घटस्फोट देऊ शकत होतात. परंतु, तुम्ही तिच्याशी क्रुर वागू शकत नाही.

कोर्टाने हे सुद्धा म्हटले की, एफआयआरमध्ये आरोपी नेहमी एकतर्फीच असतात. असा कोणताही एफआयआर नसतो ज्यामध्ये आरोपी आणि तक्रारदार सोबत दाखल करतील.

या प्रकरणात आता पतीला अटक केली जाईल. मात्र, राजस्थान कोर्टातून आरोपीच्या आई-वडीलांना अटकपूर्व जामीन मिळाला आहे.