जन्मदाताच उठला पोटच्या मुलांच्या जिवावर, पोलीस बापाकडून मुलांंना चामडी पट्ट्याने अमानुष मारहाण

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – क्रुर पोलीस बापाने पोटच्या मुलांना चामडी पट्टयाने अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इगतपुरी तालुक्यातील तळेगावात ही घटना उघडकीस आली आहे. मानवी ह्रदय हेलावून टाकणारी ही घटना अंगावर शहारे आणते.

पोटच्या कोवळ्या जीवांच्या शरीरावर पट्ट्याचे आसूड ओढताना त्या पित्याच्या निर्दयी मनाला पाझर कसा नाही फुटला ? असा संतप्त सवाल जनसामान्यातून उपस्थित केला जात आहे. तळेगाव (ता. इगतपुरी) येथे राहणाऱ्या व पेशाने रेल्वे पोलीस असलेल्या एका बापाने आपल्या पोटच्या मुलांना दुसऱ्या पत्नीला हाताशी धरुन अमानुषपणे मारहाण करत क्रौर्याची सीमा ओलांडली.

कमरेला लावण्यासाठी वर्दीसोबत मिळणाऱ्या चामडी पट्ट्याने त्याने आपल्या मुलांना अमानुषपणे मारहाण केली होती. या दोघा संशयितांविरुध्द तीव्र संतापाची लाट इगतपुरी तालुक्यासह संपुर्ण जिल्ह्यात पसरली आहे.