Crypto Scam-Fake Coin | भारतात 1200 कोटींचा क्रिप्टोकरन्सी घोटाळा, लालच दाखवून लोकांची फिल्मी स्टाईलने फसवणूक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Crypto Scam-Fake Coin | देशात एक बनावट क्रिप्टोकरन्सी घोटाळा (Cryptocurrency Scam) समोर आला आहे. नवीन क्रिप्टोकरन्सीच्या नावावर सुमारे 900 लोकांकडून 1200 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ईडीने (Enforcement Directorate) याबाबत खुलासा केला आहे. या घोटाळ्याच्या संदर्भात ईडीने देशात अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. केरळमधील एक व्यक्ती याचा मास्टरमाईंड आहे जो कि तो आता देशातून पळून गेला आहे असे मानले जात आहे. त्याच्यावर मनी लाँड्रिंगचे (Money Laundering) गुन्हेही सुरू आहेत. (Crypto Scam-Fake Coin)

ईडीने एका दक्षिण चित्रपट (Tollywood) अभिनेत्याच्या (Actor) घरावरही छापे टाकले आहेत. अभिनेत्याने या क्रिप्टोकरन्सी घोटाळ्याशी कोणताही संबंध असल्याचे सांगण्यास नकार केला आहे. इनिशियल कॉईन ऑफरिंग (IOC) च्या नावाखाली घोटाळेबाजांनी हा घोटाळा केला आहे. 2020 मध्ये लॉकडाऊन दरम्यान फसवणूक झालेल्यांपैकी बहुतेक लोकांनी “मॉरिस कॉईन” हे बनावट नाणे विकत घेतले होते.

 

असा केला घोटाळ्याचा प्लॅन

सूत्रानुसार, असे समोर आले आहे कि बनावट क्रिप्टोकरन्सी “मॉरिस कॉईन”ला 2020 मध्ये कोयंबटूर बेस्‍ड क्रिप्‍टोकरेंसी एक्‍सचेंज Franc Exchange बरोबर लिस्ट केले होते. IPO प्रमाणेच ते लोकांसमोर सादर केले गेले. 10 मॉरिस नाण्यांची किंमत 15,000 रुपये ठेवण्यात आली होती आणि त्याचा लॉक-इन कालावधी 300 दिवसांचा होता. गुंतवणूकदाराला एक ई-वॉलेटही देण्यात आले होते. या बनावट क्रिप्टोकरन्सीच्या प्रोमोटर ने गुंतवणूकदारांना ती लवकरच महाग होणार असल्याचे आमिष दाखवले आहे. (Crypto Scam-Fake Coin)

Long Rich Technologies, Long Rich Trading आणि Long Rich Global सारख्या कंपन्यांनी सुरुवातीला ऑनलाइन एज्युकेशन ॲप असल्याचे सांगून गुंतवणूकदारांना आकर्षित केले. नंतर मॉरिस कॉईनला त्यांची स्वतःची क्रिप्टोकरन्सी म्हणून ओळख करून दिली आणि दावा केला की ते क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजबरोबर लिस्ट झाले आहे. तसेच त्यांनी काही जलद पैसे दुप्पट करण्याच्या योजनाही राबवल्या आणि गुंतवणूकदारांकडून पैसे घेतले.

 

रिअल इस्टेट आणि इतर कामात पैसे गुंतवले.

ईडीच्या सूत्रांचे म्हणणे आहे की, घोटाळेबाजांनी गुंतवणूकदारांकडून घेतलेल्या पैशातून रिअल इस्टेटमध्ये बेकायदेशीरपणे गुंतवणूक केली. केरळ (kerala), तामिळनाडू (tamilnadu) आणि कर्नाटकमध्ये (karnatak) सर्वाधिक गुंतवणूक करण्यात आली आहे. गुंतवलेल्या रकमेचा सोर्स त्यांनी उघड केला नाही. ईडी गेल्या अनेक दिवसांपासून केरळ, तामिळनाडू आणि दिल्लीत छापामार कारवाई करत आहे. छापे टाकण्यात आलेल्यांमध्ये बेंगळुरूमध्ये लाँग रिच टेक्नॉलॉजीज आणि मॉरिस ट्रेडिंग सोल्युशन्सचा समावेश आहे.

 

मल्याळम अभिनेत्याच्या कंपनीवरही छापा टाकला.

ईडीने Unni Mukundan Films Pvt. Ltd वरही छापा टाकला आहे.
ही फर्म मल्याळम अभिनेते उन्नी मुकुनंदन (unni mukundan) आणि नेक्स्टल ग्रुप (nextel group) यांच्या मालकीची आहे.
मुकुनंदन यांनी मात्र बनावट क्रिप्टोकरन्सी घोटाळ्याशी कोणताही संबंध असल्याचे सांगण्यास नकार दिला आहे.
मुकुनंदन म्हणाले की, ईडीने त्यांच्या उपक्रमांमध्ये गुंतवलेल्या निधीच्या सोर्स बाबत चौकशी केली आहे.

 

31 वर्षांचा तरुण किंगपिन

या संपूर्ण घोटाळ्याचा सूत्रधार म्हणून ईडीने केरळच्या मल्लापुरम (malappuram) जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या निषाद (nishad) नावाच्या तरुणाचे वर्णन केले आहे.
अभिनेता मुकुनंदनचे निषादसोबत संबंध असल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
मात्र, त्यांनी नात्याचे स्वरूप सांगण्यास नकार दिला.
गेल्या वर्षी पोलिसांनी निषादविरुद्ध कन्नूर आणि मल्लापूरमध्ये चिटफंड योजना (chit fund scheme) चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
त्यानंतर ईडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला. निषादला पोलिसांनी अटक केली, मात्र जामिनावर सुटल्यानंतर तो देश सोडून गेला.

 

Web Title :-  Crypto Scam-Fake Coin | crypto scam fake crypto coin investors lose over rs 1200 crore in india

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nana Patole | पंजाबच्या घटनेमागे HM अमित शहांचा तर हात नाही ना ? पटोले यांचा गंभीर आरोप

 

LIC Jeevan Pragati Plan | दररोज केवळ 200 रुपये वाचवून बनवा 28 लाख रुपयांचा मोठा फंड, जाणून घ्या सविस्तर

 

Demat Account Increased in India | लॉकडाऊन आणि WFH ने शेअर मार्केटला नवीन गुंतवणूकदार दिले, दोन वर्षांत दुप्पट झाली डिमॅट अकाऊंट