Cryptocurrency Bill 2021 | भारतात सर्व खासगी क्रिप्टोकरन्सीवर प्रतिबंध ! मोदी सरकार हिवाळी अधिवेशनात संसदेत सादर करणार क्रिप्टोकरन्सीसह 26 बिले (विधेयके)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Cryptocurrency Bill 2021 | मोदी सरकार (Modi Government) 29 नोव्हेंबरपासून सुरू होत असलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात लोकसभेत (lok sabha winter session 2021) 26 नवीन बिले सादर करू शकते. सरकारने लोकसभेत जी नवीन बिले सादर करण्याचे ठरवले आहे, त्यामध्ये क्रिप्टोकरन्सी नियंत्रित करण्याच्या बिलाचा (Cryptocurrency Bill 2021) सुद्धा समावेश आहे.

RBI द्वारे जारी करण्यात येणार्‍या अधिकृत डिजिटल चलनाच्या (Indian Digital Currency) निर्मितीच्या सुविधेसाठी सरकार संसदेत क्रिप्टोकरन्सीवर विधेयक सादर (Crypto Bill 2021) करेल. क्रिप्टो करन्सी संबंधित विधेयकात भारतात सर्व खासगी क्रिप्टोकरन्सीवर प्रतिबंध, परंतु अंतर्गत तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी काही अपवादांना परवानगीचा प्रस्ताव असेल.

 

पंतप्रधानांनी देशांना केले होते आव्हान

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 18 नोव्हेंबरला सर्व लोकशाही देशांना मिळून हे ठरवण्यासाठी आव्हान केले होते की,
क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency Bill 2021) चुकीच्या हातात जाऊ देऊ नका, अन्यथा तरूणांचे भविष्य बरबाद होऊ शकते.
त्यांनी डिजिटल क्रांतीमधून समोर येणार्‍या आव्हानांना तोंड देण्यासाठी समान विचाराच्या देशांनी एकत्र येण्यावर जोर दिला.

पंतप्रधानांनी ऑस्ट्रेलियाकडून आयोजित ‘सिडनी संवाद’ला डिजिटल माध्यमातून संबोधित करत म्हटले की,
डाटा ‘नवीन शस्त्र’ बनत आहे आणि हे देशांच्या पसंतीवर अवलंबून असेल की ते तंत्रज्ञानाच्या सर्व साधनांचा वापर सहयोगासाठी करतात की संघर्षासाठी,
बळ वापरून शासनासाठी करतात किंवा पसंतीनुसार, प्रभुत्वासाठी करतात की विकासासाठी.

पीएम मोदी यांनी क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency Bill 2021) किंवा बिटकॉईनचे (Bitcon) उदाहरण देत म्हटले की,
हे महत्वाचे आहे की सर्व लोकशाही देशांनी सोबत काम करावे आणि
हे ठरवावे की ते चुकीच्या हातात जाऊ नये, जे आपल्या तरूणांना बरबाद करू शकते.

 

Web Title :- Cryptocurrency Bill 2021 | cryptocurrency bill 2021 modi government to introduce regulation of official digital currency bill 2021 in winter session of parliament

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | गोयल गंगा ग्रुपचे अतुल गोयल व अमित गोयल यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल, बनावट खरेदी खताद्वारे SRA प्रकल्प राबविण्याचा प्रयत्न

IND Vs PAK Cricket Series | भारत-पाकिस्तान सीरीजची योजना बनवत ‘हे’ क्रिकेट बोर्ड, चेयरमनने केला खुलासा

Pune Crime | भारत-न्यूझीलंड सामन्यावर सट्टा घेताना तिघांना अटक; 20 लाखाचा मुद्देमाल जप्त

Sameer Wankhede | ‘NCB ने माझ्या मुलाला खोट्या गुन्ह्यात अडकवलं’, सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्तांचा (ACP) आरोप

WHO Europe Office | COVID मुळे यूरोपात होऊ शकतात आणखी 7 लाख मृत्यू, WHO ने हिवाळ्यासाठी दिला गंभीर इशारा