Cryptocurrency चा बुडबुडा फुटला, Bitcoin मध्ये यावर्षी होऊ शकते घसरण : रिपोर्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Cryptocurrency चा फुगा फुटला आहे आणि Bitcoin या वर्षी लक्षणीयरीत्या खाली येऊ शकते, अशी माहिती अमेरिकन गुंतवणूक कंपनी Invesco ने एका अहवालात दिली आहे. गुंतवणूक कंपनीने काही परिणामांबद्दल एक अंदाज वर्तवला जो अशक्य वाटत असला तरी शक्य आहे. (Cryptocurrency)

 

यूएस इन्व्हेस्टमेंट कंपनीचे जागतिक प्रमुख (asset allocation) पॉल जॅक्सन यांनी एका निवेदनात म्हटले की, बिटकॉइनचे मोठ्या प्रमाणावर मार्केटिंग 1929 मध्ये स्टॉक मार्केट क्रॅश होण्यापूर्वी स्टॉक ब्रोकर्सच्या हालचालींची आठवण करून देते.

 

घसरणीचा आहे अंदाज
जॅक्सन म्हणाले, बिटकॉईन या वर्षी 30,000 च्या खाली येऊ शकतात, अंदाज वर्तवणे ही अतिशयोक्ती आहे. ते म्हणाले की असे होण्याची किमान 30% शक्यता आहे.

 

2021 मध्ये आली होती प्रचंड तेजी
2021 च्या सुरूवातीला Bitcoin सुमारे33,000 डॉलरच्या जवळपास होते. गेल्या वर्षी यात खूप तेजी आली आणि नोव्हेंबरमध्ये ते69,000 डॉलरवर पोहोचले. जगातील सर्वात मेाठ्या क्रिप्टोकरन्सीमध्ये लक्षणीय घट झाली आहे आणि सोमवारी सुमारे 42,300 डॉलरचा व्यापार सुरू होता. (Cryptocurrency)

अशाप्रकारे होऊ शकते घसरण
जॅक्सन यांनी बिटकॉइनला फायनान्शियल मायनिया म्हणून संबोधून म्हटले की, लवकरच त्यात घट होण्याची शक्यता आहे. त्यांनी लिहिले आहे की कोणत्याही फायनान्शियल मायनियाच्या पिकवर पोहचल्यानंतर साधारणपणे एका वर्षात 45% पर्यंत घसरण होते.

 

ते म्हणाले की, बिटकॉइनमध्येही असाच प्रकार पाहायला मिळतो. ऑक्टोबरपर्यंत ते सुमारे 34,000-37,000 डॉलरपर्यंत घसरू शकते.
मात्र, ते आणखी घसरू शकते आणि 30,000 डॉलरच्या खालीही येऊ शकते.
परंतु, गुंतवणूक फर्मने सावध केले की त्यांचे अंदाज पूर्णपणे खरे ठरतील हे निश्चितपणे सांगता येणार नाही.

 

राजन यांनीही म्हटले बुडबुडा
RBI चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी नोव्हेंबरमध्ये क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) ची तुलना अनियंत्रित चिट-फंडशी केली.
ते म्हणाले होते की, कोणत्याही गोष्टीचे मूल्य भविष्यात वाढू शकते म्हणून असेल तर तो खरोखरच बुडबुडा आहे.

 

Web Title :- Cryptocurrency | crypto bubble is over bitcoin can slump below 30000 this year says invesco report

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Coronavirus in Maharashtra | राज्यात नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक, गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 43,697 नवीन रुग्ण; जाणून घ्या इतर आकडेवारी

 

SSC HSC Exam 2022 | 10 वी-12 वीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार; शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

 

Pimpri Corona Updates | पिंपरी चिंचवडमध्ये रुग्णसंख्येत मोठी वाढ ! गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 3500 पेक्षा अधिक नवीन रुग्ण; जाणून घ्या इतर आकडेवारी