‘सीरिया’ शब्दामुळं भारताला बदलावं लागलं ‘या’ बँकेचं नाव, 410 कोटींसाठी केली नव्या प्लॅनची घोषणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – केरळमधील प्रायव्हेट सेक्टर बँक कॅथोलिक सीरियन बँकेचं नाव बदलण्यात आलं आहे. आता या बँकेचं नाव सीएसबी बँक ठेवण्यात आलं आहे. या बँकेनं आता आयपीओ आणण्याची घोषणा केली आहे. यानुसार बँक जवळपास 410 कोटी रुपये जमवणार आहे. याची प्राईस बँकेनं 193 रुपये, 195 रुपये प्रति शेअर निश्चित केली आहे. ही बँक 22 नोव्हेंबर रोजी उघडणार आहे तर 26 नोव्हेंबर रोजी बंद होणार आहे. गेल्या वर्षीच प्रम वत्सची कंपनी फेयरफॅक्स इंडिया होल्डिंग्स कॉर्पोरेशनला सीएसबी बँकेची प्रमुख हिस्सेदारी खरेदी करण्यासाठी भारतीय रिझर्व बँकेकडून विशेष परवानगी मिळाली होती. या बँकेचं मुख्यालय केरळच्या त्रिसूरमध्ये आहे. वत्सनं लिस्टींगच्या अटीवरच ही बँक खरेदी केली होती.

– या बँकेनं सीरिया युद्धाच्या कारणामुळं आपलं नाव बदललं आहे. बँकेच्या नावातील सीरिया शब्दामुळे एनआरआय ग्राहक परदेशातून आपल्या खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकत नव्हते.

– युद्धग्रस्त पश्चिमी आशियाई देश सीरियाची हालत पाहून अनेक बँकांनी सीरियाला त्यांच्या तिथे बॅन केलं आहे. त्यामुळे परदेशी बँक कॅथोलिक सीरियन बँकेत सीरिया शब्द पाहून त्याला आपोआप फिल्टर करतात.

– बँकेने आपल्या वक्तव्यात म्हटलं आहे की, त्यांनी 2015 मध्येच नाव बदलण्यासाठी आरबीआयकडे अर्ज केला आहे. बँकेचं म्हणणं आहे की अनेक आयातदार आणि निर्यातदारांना अडचणींचा सामना करावा लागला आहे. कारण बँकेच्या लेटर ऑफ क्रेडिटला दुसऱ्या बँक स्विकार करत नाहीत. त्यामुळे बँकेने नावातून सीरियन शब्द काढला आहे. हे 10 जून 2019 पासून लागू झालं आहे.

Visit : Policenama.com