भारतीय संशोधकांनी तयार केला ‘स्वदेशी’ मॅकेनिकल व्हेंटिलेटर, किंमत सुद्धा खुप कमी

दुर्गापुर (पश्चिम बंगाल) : कोविड-19 चे रूग्ण आणि ज्या रूग्णांना श्वास घेण्यास त्रास होतो आणि जे व्हेंटिलेटरचा खर्च करू शकत नाहीत, त्यांच्यासाठी चांगली बातमी आहे. संशोधक आणि औद्योगिक संशोधन परिषद – केंद्रीय तंत्रज्ञान अभियांत्रिकी संशोधन संस्था (सीएसआयआर-सीएमयआरआय) दुर्गापुर यांनी स्वदेशी टेक्नॉलॉजीयुक्त एक मॅकेनिकल व्हेंटिलेटर तयार केला आहे.

संस्थेच्या वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले की, या व्हेंटिलरच्या दोन खास गोष्टी आहेत, हा पोर्टेबल (हाताळण्यासाठी सोपा) असून याची किंमत खुप कमी आहे. माहितीनुसार या स्वदेशी मॅकेनिकल व्हेंटिलेटरची किंमत 90 हजार ते एक लाख रुपयांच्या दरम्यान असू शकते.

सीएसआयआर-सीएमयआरआय दुर्गापुरचे प्रोफेसर हरीश हिरानी यांनी या व्हेंटिलेटरबाबत सांगितले की, यामध्ये डिझाईन, कंट्रोलर आणि इलेक्ट्रॉनिक्स भागांना अशाप्रकारे बनवले गेले आहे ज्यामध्ये किंमतीवर फरक पडू नये, सोबतच हा संबंधित उद्योगांसाठी प्रासंगिक सुद्धा असावा.

त्यांनी म्हटले की, यास विकसित करण्याच्या प्रक्रियेत दुर्गापुरच्या हेल्थ वर्ल्ड हॉस्पिटल आणि विवेकानंद हॉस्पिटलच्या आरोग्य तज्ज्ञांची मदत घेण्यात आली. त्यांच्याकडून आलेल्या महत्त्वपूर्ण प्रतिक्रियांचा विचार करून व्हेंटिलेटरच्या डिझाईनमध्ये अनेक बदल करण्यात आले, तसेच याच्या टेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा बदल केला गेला.

प्रोफेसर हिरानी यांनी म्हटले, अन्य रूग्णांना सुद्धा याचा फायदा व्हावा यासाठी येत्या काळात या व्हेंटिलेटरला आणखी अपग्रेड करण्यात येईल. या मॅकेनिकल व्हेंटिलेटरचे दोन हॉस्पिटलमध्ये क्लिनिकल ट्रायल केल्यानंतर 3 जून रोजी तो समोर आणण्यात आला होता. कोविड-19 चे रूग्ण आणि ज्या रूग्णांना श्वास घेण्यास त्रास होतो आणि जे व्हेंटिलेटरचा खर्च करू शकत नाहीत, त्यांच्यासाठी चांगली बातमी आहे. संशोधक आणि औद्योगिक संशोधन परिषद – केंद्रीय तंत्रज्ञान अभियांत्रिकी संशोधन संस्था (सीएसआयआर-सीएमयआरआय) दुर्गापुर यांनी स्वदेशी टेक्नॉलॉजीयुक्त एक मॅकेनिकल व्हेंटिलेटर तयार केला आहे.

संस्थेच्या वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले की, या व्हेंटिलरच्या दोन खास गोष्टी आहेत, हा पोर्टेबल (हाताळण्यासाठी सोपा) असून याची किंमत खुप कमी आहे. माहितीनुसार या स्वदेशी मॅकेनिकल व्हेंटिलेटरची किंमत 90 हजार ते एक लाख रुपयांच्या दरम्यान असू शकते.

सीएसआयआर-सीएमयआरआय दुर्गापुरचे प्रोफेसर हरीश हिरानी यांनी या व्हेंटिलेटरबाबत सांगितले की, यामध्ये डिझाईन, कंट्रोलर आणि इलेक्ट्रॉनिक्स भागांना अशाप्रकारे बनवले गेले आहे ज्यामध्ये किंमतीवर फरक पडू नये, सोबतच हा संबंधित उद्योगांसाठी प्रासंगिक सुद्धा असावा.

त्यांनी म्हटले की, यास विकसित करण्याच्या प्रक्रियेत दुर्गापुरच्या हेल्थ वर्ल्ड हॉस्पिटल आणि विवेकानंद हॉस्पिटलच्या आरोग्य तज्ज्ञांची मदत घेण्यात आली. त्यांच्याकडून आलेल्या महत्त्वपूर्ण प्रतिक्रियांचा विचार करून व्हेंटिलेटरच्या डिझाईनमध्ये अनेक बदल करण्यात आले, तसेच याच्या टेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा बदल केला गेला.

प्रोफेसर हिरानी यांनी म्हटले, अन्य रूग्णांना सुद्धा याचा फायदा व्हावा यासाठी येत्या काळात या व्हेंटिलेटरला आणखी अपग्रेड करण्यात येईल. या मॅकेनिकल व्हेंटिलेटरचे दोन हॉस्पिटलमध्ये क्लिनिकल ट्रायल केल्यानंतर 3 जून रोजी तो समोर आणण्यात आला होता.