CSIR : 12 वी पास अन् टायपिंग ‘स्पीड’ फास्ट असणार्‍यांनी तात्काळ करा नोकरीसाठी अर्ज, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  CSIR – NEIST, जोरहाट मधील बर्‍याच पदांसाठी भरती होणार आहे. त्यानुसार ०५ कनिष्ठ सचिवालय सहाय्यक पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांसाठी उमेदवार ०६ जानेवारी २०२० रोजी किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतात.

महत्त्वाच्या तारखा :-

– ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख : ०६ जानेवारी २०२०

– अर्जाची हार्ड कॉपी मिळण्याची शेवटची तारीखः १६ जानेवारी २०२०

पदांचे वर्णन :-

– कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (सामान्य) – ०२

– कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (वित्त व लेखा) – ०२

– कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (स्टोअर आणि खरेदी) – ०१

निवड प्रक्रिया :-

उमेदवारांनी लक्षात घ्यावे की निवड प्रक्रियेमध्ये लेखी परीक्षा आणि संगणक टाइपिंगची गती इत्यादींचा समावेश आहे. स्पर्धात्मक लेखी परीक्षेत उमेदवाराच्या कामगिरीच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाईल.

अर्ज कसा करावा :-

पात्र उमेदवारांना ०६ जानेवारी २०२० रोजी किंवा त्यापूर्वी CSIR-NEIST वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करावा लागेल. यशस्वीरित्या सबमिट केलेल्या ऑनलाइन अर्जाची प्रिंटआउट टपालाद्वारे पाठवावी लागेल आणि सर्व आवश्यक कागदपत्रांसह १६ जानेवारी २०२० च्या आधी दिलेल्या पत्त्यावर पोहोचावे लागेल.

शैक्षणिक पात्रता :-

कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (सामान्य) – १०+२ पास आणि संगणकात टाइपिंगमध्ये परिपूर्ण

कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (वित्त व लेखा) – १०+२ पास आणि संगणक टाइपिंगमध्ये परिपूर्ण

कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (स्टोअर आणि खरेदी) – १०+२ पास आणि संगणक टाइपिंगमध्ये परिपूर्ण

पोस्टच्या शैक्षणिक पात्रतेच्या तपशीलांसाठी आपण अधिकृत वेबसाइटला http://www.neist.res.in/ भेट देऊ शकता.

Visit : Policenama.com