सीएसएमटी पूल दुर्घटना : हाय कोर्टात मृतांच्या कुटुंबीयांना 1 कोटी देण्याच्या मागणीची याचिका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाजवळ पादचारी पूलचा भाग कोसळ्याची घटना तीन दिवसांपूर्वी समोर आली. या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला तर ३१ जखमी झाले होते. या सीएसएमटी पूल दुर्घटनेविरोधात हाय कोर्टात नवी याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यात मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी एक कोटी रुपये तर जखमींना 25 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे.

हाय कोर्टात दाखल करण्यात आलेल्या या नव्या याचिकेत मुख्यमंत्री, महापालिका आयुक्त, रेल्वे व्यवस्थापक यांच्यासह महापौरही प्रतिवादी आहेत. यात मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी एक कोटी तर जखमींना २५ लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे.

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाजवळ पादचारी पूलाचा स्लॅब कोसळल्याची मोठी दुर्घटना घडली. या घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला असून ३१ जण यात गंभीर जखमी झाले आहेत. यानंतर आता या पूल दुर्घटनेप्रकरणी पालिकेकडून पहिली कारवाई करण्यात आली आहे. या पुलाच्या ऑडिटसंबंधी जबाबदार असणाऱ्या दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. मुख्य अभियंता ए. आर. पाटील तसेच सहाय्यक अभियंता असणाऱ्या एस. एफ. काकुळते यांचे निलंबन करण्यात आले आहे तर मुख्य अभियंता एस. ओ. कोरी आणि उपमुख्य अभियंता आर. बी. तारे यांची खात्याअंतर्गत चौकशी केली जाणार असल्याची माहिती समोर आली होती.