‘शिक्षक भरती’साठी अनिवार्य असलेल्या ‘CTET’ च्या ऑनलाइन ‘अर्ज’ प्रकियेला सुरुवात, ‘ही’ आहे अंतिम तारीख

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्हाला केंद्रीय विद्यालय किंवा केंद्र सरकारच्या कोणत्याही शाळेत नोकरी करण्याची इच्छा असेल तर तुम्हाला सर्वात महत्वाची आहे. CTET ही प्रवेश परिक्षा. ही परिक्षा अनिवार्य असून याशिवाय केंद्र सरकारच्या कोणत्याही शाळेत शिक्षक पदासाठी नोकरी मिळणार नाही. या शिक्षक पदासाठी सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडी एजुकेशन, सीबीएसई कडून CTET ही प्रवेश परिक्षा घेण्यात येते. या डिसेंबरला आयोजित सीटेट 2019 च्या परिक्षेसाठी ऑनलाइन अर्ज प्रकिया सुरु करण्यात येणार आहे. ही परिक्षा 8 डिसेंबरला आयोजित करण्यात आली आहे.

या परिक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना CTET च्या आधिकृत वेबसाइटवर (ctet.nic.in) जाऊन अर्ज करता येईल.

– ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख – 18 सप्टेंबर 2019
– परिक्षा शुल्क भरण्यासाठी अंतिम तारीख – 23 सप्टेंबर 2019
– परिक्षा 20 भाषांमध्ये 110 शहरात आयोजित करण्यात येणार आहे.

अर्ज करण्यासाठीची प्रकिया –
1. CBSE CTET च्या आधिकृत वेबसाइट ctet.nic.in वर जावे लागेल.
2. होमपेज वर असलेल्या CTET December 2019 या लिंक वर क्लिक करावे.
3. नवे पेज ओपन होऊल, तेथे CTET 2019 वर क्लिक करा.
4. येथे आवश्यक माहिती भरुन सब्मिट करा.
5. अर्ज डाऊनलोड करा, प्रिंटआऊट घ्या.

प्रवेश परिक्षा अनिवार्य –
केंद्रीय पात्रता परिक्षा दर वर्षी CBSE कडून आयोजित करण्यात येते. 1 ली ते 8 वी च्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी ही प्रवेश परिक्षा अनिवार्य करण्यात आली आहे. ही परिक्षा क्वालिफाय करणे अनिवार्य आहे. केंद्रीय शाळा, केंद्रीय विद्यालये आणि नवोद्य विद्यालयमध्ये शिक्षक पदासाठी ही परिक्षा देणे आवश्यक असणार आहे.

 

You might also like