मोठी बातमी ! CTET परीक्षा स्थगित, HRD मिनिस्टर रमेश पोखरियाल यांची घोषणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सीबीएसई बोर्डाची परीक्षा रद्द केल्याची घोषणा झाल्यानंतर आता CTETची परीक्षा सुद्धा रद्द केली आहे. मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली. परीक्षा 5 जुलैला होणार होती. ट्विटमध्ये एचआरडी मिनिस्टरने म्हटले आहे की, सीबीएसईद्वारे आयोजित करण्यात येणारी परीक्षा सध्या स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्थिती अनुकूल होताच, त्यानंतर पुढील तारीखेची घोषणा केली जाईल.

अ‍ॅडमिट कार्ड जारी केले नव्हते
सीटेटची परीक्षा कॅन्सल होऊ शकते, असा अंदाज लावला जात होता, कारण की साधारणपणे परीक्षा होण्यापूर्वी दोन आठवडे अगोदरच सीटेटचे अ‍ॅडमिट कार्ड रिलीज केले जाते. यासाठी विद्यार्थी खुप अतुरतेने अ‍ॅडमिट कार्डची वाट पाहात होते. परंतु, या आठवड्यात अ‍ॅडमिट कार्ड जारी केले नाहीत. नंतर सीबीएसई बोर्डाची परीक्षा रद्द झाल्यानंतर असे मानले जात होते की, सीटेटची परीक्षासुद्धा कँसल केली जाऊ शकते.

5 जुलैला होणार होती परीक्षा
सीटेटची परीक्षा 5 जुलैला होणार होती. अधिकृत वेबवाईटनुसार परीक्षा सकाळी व संध्याकाळी अशा दोन शिफ्टमध्ये होणार होती. सोबतच जूनच्या दुसर्‍या आठवड्यात अ‍ॅडमिट कार्ड जारी करण्याची घोषणासुद्धा सीबीएसईने केली होती. परंतु, नंतर परिस्थिती सामान्य नसल्याने हा निर्णय घेतला गेला. पुढील माहितीसाठी कँडीडेट्सने सीबीएसईच्या वेबसाइटला भेट देत रहावे, कोणत्याही अफवांकडे लक्ष देऊ नये.

सीबीएसईची बोर्ड परीक्षासुद्धा कँसल
देशभरात कोरोना व्हायरस सतत वाढत असल्याने केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाने सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या 1 ते 15 जुलैदरम्यान होणार्‍या परीक्षा रद्द केल्या आहेत. सीबीएसई बोर्डाच्या प्रलंबित परीक्षा 1 जुलै ते 15 जुलै होणार होत्या. पण परीक्षा रद्द करण्याबाबत काही पालकांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती, ज्यानंतर कोर्टाने सीबीएसईला विचारले होते की, परीक्षा रद्द केली जाऊ शकते का. यानंतर आता बोर्डाने आपले उत्तर दाखल करत कोर्टाला दहावी आणि बारावीच्या उर्वरित परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाची माहिती दिली. स्थिती सामान्य झाल्यानंतर 12वीची परीक्षा घेतली जाऊ शकते.