Advt.

CTET Exam Pune | उशिरा आलेल्या परीक्षार्थींनी जबरदस्तीने गेट उघडून केला प्रवेश; रामटेकडी येथील परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – CTET Exam Pune | केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) या परीक्षा केंद्रात उशीरा आलेल्या परीक्षार्थींनी जबरदस्तीने गेट उघडून आत प्रवेश केल्याने आज सकाळी रामटेकडी (Ramtekdi) येथे एकच गोंधळ उडाला. (CTET Exam Pune)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामटेकडी येथे केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा केंद्र (CTET Exam Pune) आहे. या ठिकाणी परीक्षेसाठी केंद्रात प्रवेशासाठी सकाळी साडेसात ते सव्वा नऊ अशी वेळ देण्यात आली होती. याबाबतच्या सूचना हॉल तिकीटावर स्पष्टपणे नोंदविण्यात आल्या होत्या. त्यानुसार सव्वा नऊ वाजता तेथील कर्मचार्‍यांनी गेट बंद केले. त्यानंतर सुमारे ४० परीक्षार्थी उशिरा आले. त्यांनी गेट उघडण्याची मागणी केली. मात्र, कर्मचार्‍यांनी गेट उघडण्यास नकार दिल्याने त्यांच्या वादावादी झाली.

तेव्हा काही जणांनी पुढाकार घेऊन गेट उघडून आत प्रवेश केला. त्यातून परीक्षा केंद्रावर गोंधळ उडाला. याची माहिती मिळाल्यावर वानवडी पोलीस (Wanwadi Police Station) घटनास्थळी दाखल झाले. मात्र, परीक्षार्थींनी माफी मागितल्यास त्यांचे नुकसान होऊ नये, म्हणून कोणतीही तक्रार देणार नसल्याचे परीक्षा आयोजकांनी पोलिसांना सांगितले आहे. या सर्व प्रकारात उशिरा आल्याने सुमारे ४० परीक्षार्थींना परीक्षेला मुकावे लागले आहे.

Web Title : CTET Exam Pune | Late examinees forcibly opened the gate and entered; Confusion erupted at the examination center at Ramtekdi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे हि वाचा

 

Vitamin And Mineral For Health | इम्यूनिटी, हाडे, मेंदू आणि डोळे मजबूत बनवतात व्हिटॅमिन A,B,C,D; ‘हे’ मिनरल सुद्धा आवश्यक, जाणून घ्या

Uric Acid | तुमच्या शरीरात होत असेल ‘ही’ समस्या, तर यूरिक अ‍ॅसिड वाढल्याचा असू शकतो संकेत; जाणून घ्या

Covid-19 vs Influenza | सर्दी-ताप, डोकेदुखीची लक्षणे ‘कोविड’ची आहेत की ‘फ्लू’ची, हे कसे ओळखावे? जाणून घ्या

Aloe Vera Juice Benefits | रोज प्याल एलोवेरा ज्यूस तर शरीराला होतील ‘हे’ 5 फायदे; जाणून घ्या

Maratha Reservation | उद्धव ठाकरे, शरद पवारांच्या घरावर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी धडकणार ‘लाँग मार्च’ (व्हिडिओ)

Mahavikas Aghadi | राष्ट्रवादी-शिवसेनेत वादाची ठिणगी ! आघाडी न करण्याची महापौरांची भूमिका

Vistadome Coach | मध्य रेल्वेवरील ‘व्हिस्टाडोम कोच’ना प्रचंड प्रतिसाद ! गेल्या 3 महिन्यात 20,407 प्रवाशांची नोंद, उत्पन्न रु.2.38 कोटी

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 41 हजारांपेक्षा जास्त रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी