CTET EXAM : ‘वहिनी’च्या जागी ‘नणंद’ आली, ‘आई’च्या नावामुळं बिघडलं सर्वकाही, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रविवारी जनपद येथील 28 केंद्रांवर सीटीईटी (केंद्रीय अध्यापक पात्रता परीक्षा) परीक्षेचे आयोजन करण्यात आलेले होते. 24,270 नोंदणीकृत सभासदांपैकी 2,130 जणांनी परीक्षा सोडली आहे. यादरम्यान वहिनीऐवजी परीक्षेला नणंद बसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबतची तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. नियोजनानुसार परीक्षेच्या दरम्यान सीसीटीव्हीचे सुद्धा आयोजन करण्यात आलेले होते. पहिल्या टप्प्यात झालेल्या 9:30 ते दुपारी 12 वाजेपर्यंतच्या परीक्षेमध्ये 15,992 नोंदणीकृत सभासदांपैकी 14,684 जणांनी परीक्षा दिल्या.

1308 उमेदवार गैरहजर होते. दुसऱ्या टप्प्यातील कनिष्ठ शाळेसाठी परीक्षा दुपारी 2 ते 4:30 या वेळेत 17 केंद्रांवर घेण्यात आली. नोंदणीकृत 8,278 पैकी 7,446 उमेदवारांनी हजेरी लावली. 832 उमेदवार यावेळी गैरहजर राहिले.

रिफायनरी नगर येथील केंद्रीय विद्यालयात तपासणी करतांना एक बनावट विद्यार्थीनी पकडली गेली आहे. प्राचार्य सुबोधकुमार अग्निहोत्री यांनी राया येथील रहिवासी असलेल्या राजराणीच्या जागी शिवानी चौधरीला पकडले असल्याची माहिती दिली आहे.

परीक्षेच्या दरम्यान वर्ग निरीक्षकांनी शिवानीला आपल्या आईचे नाव लिहिण्यासाठी सांगितले तेव्हा तिने रेकॉर्डच्या हिशोबाने ते नाव चुकीचे लिहिले. तपासणी केली असता हे स्पष्ट झाले की ती आपल्या वाहिनीच्या जागेवर परीक्षा देण्यासाठी आली होती, त्यामुळे आईचे नाव लिहिण्यात गडबड झाली त्यामुळे शिवानी विरोधात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे.

Visit : Policenama.com