Budget 2021 : व्यापार्‍यांची संघटना CTI नं पंतप्रधानांना लिहीलं पत्र, मदतीच्या पॅकेजसह GST वरील चर्चासोबतच 7 मागण्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजधानी दिल्लीत व्यापाऱ्यांची संघटना ‘चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्री’ने (CTI) येत्या अर्थसंकल्पावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात अर्थसंकल्पातून व्यापारी आणि उद्योगपतींना दिलासा देण्याची मागणी केली.

याबाबत चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्रीचे (CTI) अध्यक्ष बृजेश गोयल यांनी सांगितले, की कोरोनापेक्षा सर्वात जास्त नुकसान व्यापारी वर्गाचे झाले होते. तसेच असे काही विभाग आहेत ते अद्याप पूर्ववत झाले नाहीत. त्यामुळे त्यांना दिलासा मिळावा. पंतप्रधान मोदींना पत्र लिहून व्यापाऱ्यांनी 7 प्रमुख मागण्या केल्या आहेत.

  • टॅक्स रिबेटच्या माध्यमातून करदात्यांना 5 लाखांपर्यंत आयकरात सूट देण्यात आली आहे. पण या सवलतीचा फायदा सर्व मध्यम आणि उच्चवर्गीय करदात्यांना व्हावा ज्यांचे उत्पन्न 5 लाखांपेक्षा अधिक आहे.
  • गृहकर्जावर कर सवलतीचा टप्पा वाढवायला हवा. त्यामुळे रिअर इस्टेट सेक्टरला उभारी मिळेल.
  • सरकार 50 अशा वस्तूंवर आयातीचा खर्च वाढवण्याच्या तयारीत असून, त्यामुळे मोठ्या प्रमाणात महागाई होऊन व्यापाऱ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे.
  • हॉटेल, इव्हेंट आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्राला कोरोनामुळे मोठा फटका बसला आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पात दिलासा देण्यासाठी पॅकेजची घोषणा करावी.
  • सरकारला इन्फ्रास्ट्रक्चरवरही लक्ष द्यायला हवे. देशातील उत्पादनांना प्रोत्साहित करायला हवे. देशात उद्योगांत अधिक उत्पादन होऊ शकेल.
  • बजेटमध्ये जीएसटीवरही चर्चा व्हायला हवी. जीएसटीच्या दरात कपातीसह जीएसटीच्या नियमांवर विचार व्हावा, अशा प्रमुख मागण्यांचे पत्र पंतप्रधान मोदींना देण्यात आले.