Cucumber Farming | फक्त एकदाच 1 लाख गुंतवून सुरू करा ‘हा’ व्यवसाय, दरमहा होईल 8 लाखापर्यंत कमाई; सरकार करेल आर्थिक मदत, जाणून घ्या

नवी दिल्ली : Cucumber Farming News | आज आम्ही तुम्हाला एक शानदार व्यवसाय सांगणार आहोत. ज्यामध्ये तुम्ही कमी पैसे (Business at small level investment) खर्च करून मोठी कमाई (How to earn money) करू शकता. यासाठी सर्वात चांगली आयडिया आहे काकडीची शेती (Cucumber Farming). होय…यातून तुम्हाला कमी वेळात जास्त पैसे कमावण्याची संधी (earning money) मिळेल.

काकडीचे पिक घेऊन कमवा लाखो रुपये

या पिकाचा कालावधी 60 ते 80 दिवसात पूर्ण होतो. काकडी उन्हाळ्यात असते. परंतु पावसाळ्यात
काकडीची शेती जास्त होते. काकडीची शेती सर्व प्रकारच्या मातीत केली जाऊ शकते. काकडीच्या शेतीसाठी जमिनीचा पी.एच. 5.5 ते 6.8 पर्यंत चांगला मानला जातो. काकडीची शेती नदी-तलावाच्या किनारी केली जाऊ शकते. जाणून घेवूयात काकडीच्या शेतीचा व्यवसाय कसा करावा?..

सरकारकडून सबसिडी घेऊन सुरू करा व्यवसाय

यूपीचे एक शेतकरी दुर्गाप्रसाद जे काकडीची शेती करून लाखो कमावत आहेत. ते म्हणतात, शेतीत
नफा कमावण्यासाठी शेतात काकडीची लागवड केली आणि अवघ्या 4 महिन्यात 8 लाख रुपये
कमावले. त्यांनी आपल्या शेतात नेदरलँडच्या काकडीची लागवड केली होती. दुर्गाप्रसाद यांच्यानुसार,
नेदरलँडच्या या प्रजातीच्या काकडीचे बियाणे मागवून लागवड करणारे पहिले शेतकरी आहेत.

यामध्ये विशेष बाब ही आहे की, या प्रजातीच्या काकडीत बी नसते. ज्यामुळे काकडीची मागणी
मोठ-मोठी हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये खुप वाढली. दुर्गाप्रसाद सांगतात की, उद्यान विभागाकडून 18
लाख रुपयांची सबसिडी घेऊन शेतातच सेडनेट हाऊस बनवले होते. सबसिडी घेतल्यानंतर सुद्धा
स्वताकडील 6 लाख रुपये खर्च करावे लागले होते. याशिवाय नेदरलँडवरून 72 हजार रुपयांचे
बियाणे मागवले. बियाणे पेरल्यानंतर 4 महिन्यानंतर त्यांनी 8 लाख रुपयांच्या काकड्या विकल्या.

हे देखील वाचा

Pune Crime | हॉटेल ‘गारवा’चे मालक आखाडेंच्या खून प्रकरणातील मुख्य सुत्रधारास लातूर येथून अटक, लोणी काळभोर पोलिसांकडून आतापर्यंत 10 जण गजाआड

Pune News | स्मार्ट सिटीला वर्षाची मुदतवाढ म्हणजे भाजप सरकारचा आणखी एक जुमला – माजी आमदार मोहन जोशी

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Cucumber Farming | start cucumber farming just in 1 lakh rupees investment and earn rs 8 lakh per month know how

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update