दिवसभराचा थकवा असूनही शांत झोप लागत नाही का ? करा ‘हे’ 6 आयुर्वेदिक गुणकारी उपाय

पोलिसनामा ऑनलाइन – झोप आणि आरोग्य यांचा खुप जवळचा संबंध आहे. शांत आणि पूर्ण झोप नियमित मिळत असेल तर आरोग्य आपोआपच चांगले राहते. अन्यथा आरोग्य बिघडण्यास वेळ लागत नाही. अनेकदा दिवसभर काम केल्याचा थकवा असूनही रात्री चांगली झोप येत नाही. माणसाच्या शरीराला झोप ही अतिशय आवश्यक असते, कारण आपण शांत झोपेत असतानाच शरीर ऊतींचे पुनरुज्जीवन करते. हृदय आणि रक्तवाहिन्यांचा उपचार आणि दुरुस्ती झोपेतच होते. झोपेअभावी हृदयरोग, मुत्रपिंडाचा रोग, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. चांगली झोप हवी असेल तर आयुर्वेदात अनेक घरगुती उपाय आहेत. जर तुम्हालाही रात्री चांगली झोप लागत नसेल तर हे घरगुती उपाय तज्ज्ञांच्या सल्ल्याने जरूर करा.

हे उपाय करा.

1 जायफळ
झोपण्यापूर्वी एक कप गरम दूधात थोडी जायफळ पावडर मिसळून प्या. फळांच्या रसात जायफळ पावडर घालून तो घेऊ शकता.

2 केशर
एक कप गरम दुधात दोन चिमूटभर केशर मिसळून हे दूध प्यावे. यामुळे झोप लागते शिवाय रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढण्यास मदत होते.

3 जिरे
झोपेच्या आधी जिर्‍याचा चहा घ्या. किंवा दुधात केळी कुसकरून एक चमचा जिरे पूड घालून रात्री झोपण्यापूर्वी हे मिश्रण खावे.

4 तेल
डोक्यावर आणि पायांना भृंगराज तेल लावून मालिश करा, चांगली झोप येते. अशा मालिशमुळे मज्जासंस्थेला आराम मिळतो.

5 वेळ ठरवा
चांगल्या झोपेसाठी वेळेवर झोपा. उशीरा झोपू नका. ठरलेल्या वेळी झोपी जा.

6 गरम दूध
दोन चिमूट दालचिनीची पूड एक कप कोमट दुधात मिसळा आणि झोपण्याआधी सेवन करा.