
Curd For Hair | महागड्या हेअर प्रॉडक्टऐवजी केसांना लावा दही, ‘हे’ 5 फायदे जाणून घेतले तर दररोज वापराल
पोलीसनामा ऑनलाइन टीम – Curd For Hair | तुमचे केस कमकुवत झाले आहेत, केसांची चमक नाहीशी झाली आहे, केस कोरडे आणि निस्तेज दिसू लागले आहेत, तर समजून जा की तुमच्या केसांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. पण यासाठी तुम्हाला महागडे शाम्पू, कंडिशनर किंवा हेअर मास्क वापरण्याची गरज नाही. केसांची काळजी घेण्यासाठी जर तुम्ही घरी लावलेले दही वापरले तर अनेक फायदे होतील. कारण, दह्यामध्ये भरपूर पोषक तत्व असतात जे केसांचा कमकुवतपणा दूर करण्यासाठी आणि त्यांना निरोगी ठेवण्याचे काम करतात. यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी 5, व्हिटॅमिन डी, झिंक, प्रोटीन आणि पोटॅशियम सारखे घटक असतात जे केस चमकदार आणि मजबूत बनवण्यास मदत करतात. दह्याने केस धुण्याचे काय फायदे आहेत ते जाणून घेवूयात. (Curd For Hair)
दह्याने केस धुण्याचे फायदे आणि वापरण्याची पद्धत
1. डँड्रफपासून सुटका
केसांना नियमित दही लावल्याने डँड्रफची समस्या दूर होते. एक छोटा चमचा बेसन आणि अर्धा कप दही नीट मिसळा आणि 15 ते 20 मिनिटे केसांमध्ये ठेवा. यानंतर केस पाण्याने धुवा. याच्या 2 ते 3 वेळच्या वापराने डँड्रफ दूर होईल. (Curd For Hair)
2. केस लांब करते
केसांमध्ये दही लावल्याने केस मजबूत होतात आणि नवीन केसही येतात. केसांची वाढ होण्यासाठी तुम्ही केसांना दही लावू शकता. ते मुळांना आतून मजबूत करण्यास मदत करते.
3. हेअर कंडिशनिंग
जर तुमचे केस खूप कोरडे आणि निस्तेज झाले असतील तर केस दह्याने धुवा. हे केसांचे डीप कंडिशनिंग करते, ज्यामुळे केस चमकदार होतात. एक कप दह्यात 2 चमचे मध मिसळा, केसांना लावा, 20 मिनिटे ठेवा आणि नंतर धुवा.
4. खाज सुटणे
केसांच्या मुळांमध्ये खाज येत असेल तर केसांच्या मुळांमध्ये जुने दही लावून काही वेळ तसेच राहू द्या. असे केल्याने स्काल्पला आराम वाटेल आणि समस्या दूर होईल. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यात लिंबू मिसळून केसांना लावू शकता.
5. एक्स्ट्रा केअरसाठी
केसांची अतिरिक्त काळजी घ्यायची असेल, तर एका भांड्यात दही आणि अंडे एकत्र करून डोक्याला अर्धा तास लावून ठेवा. नंतर सामान्य पाण्याने धुवा.
(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
Web Title :- Curd For Hair | benefits of curd for hair
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
High Cholesterol ची शत्रू आहे ‘ही’ हिरवी डाळ, भिजवून खाल्ल्याने होतील जबरदस्त फायदे
Sudden Stop Drinking | काय होते जेव्हा तुम्ही अचानक दारू पिणे बंद करता? जाणून घ्या
Mustard Oil Price | मोहरीच्या तेलात झाली घसरण, लोकांना मिळाला मोठा दिलासा, जाणून घ्या नवीन दर