१ वर्षात कॅन्सर बरा करणारे औषध तयार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कॅन्सर म्हणजे जवळपास मृत्यु निश्चित असे अजूनही मानले जाते. यावर जगभरात विविध संशोधन होत असून इस्त्राइलच्या संशोधकाने एक औषध तयार केले असून त्याने एका वर्षात कॅन्सर बरा होत असल्याचा दावा केला आहे.

कॅन्सर म्हणजेच कर्करोग या जीवघेण्या आजारावर ठोस असा उपाय समोर आलेला नाहीये. काही ठराविक केसेसमध्ये व्यक्ती यातून बाहेर पडतो. पण पुन्हा त्यांना कॅन्सर आपल्या जाळ्यात घेण्याचीही शक्यता असते. अनेक प्रकारच्या सर्जरी आणि केमोथेरपीच्या मदतीने कॅन्सरवर उपचार करता येतात, पण कॅन्सर मुळातून नष्ट होण्याचे प्रमाण फार कमी आहे.

कॅन्सरवर सर्वाधिक संशोधन अमेरिकेत सुरु आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींपासून शरद पवार यांनी त्यांच्यावर झालेल्या कॅन्सरवर अमेरिकेत जाऊन उपचार घेणे पसंत केले आहे.

जगभरात कॅन्सरवर वेगवेगळे उपचार केले जातात. पण हा आजार मुळातून नष्ट करण्याचा दावा कुणीच करत नाही. पण इस्त्राइलच्या अ‍ॅक्सिलेरेटेड इवॉल्यूशन बायोटेक्नॉलॉजी लिमिटेड कंपनीने हा दावा केला आहे. त्यांनी दावा केलाय की, कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराला ते पूर्णपणे दूर करू शकतात.

बारामती लोकसभा मतदार संघ बनला जानकरांची डोकेदुखी 

या शोधात दावा करण्यात आला आहे की, बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीने आणि पेप्टाइड्सच्या मदतीने कॅन्सरला नष्ट करणारे औषध तयार करण्यात आले आहे. पेप्टाइट्सला अमीनो अ‍ॅसिडचे रूप मानले जातं. सध्या या शोधात तयार करण्यात आलेलं औषध मनुष्यावर वापरण्यात आलेलं नाहीये. शोधादरम्यान या औषधाचा प्रयोग उंदरांवर करण्यात आला होता. त्यावरून हा दावा करण्यात येत आहे. पण या दाव्यावर इतर संशोधकांनी टिका केली आहे.
दरवर्षी १.८ कोटी लोकांना कॅन्सर

कंपनीने दावा केला आहे की, या औषधाचा आणि उपचाराचा उंदरांवर यशस्वी प्रयोग करण्यात आला आहे. आता याचा प्रयोग मनुष्यावर केला जाईल. त्यानंतर हे औषध पुढील वर्षी म्हणजेच २०२० मध्ये मार्केटमध्ये उपलब्ध होईल. दरवर्षी कॅन्सरचे १ कोटी ८० लाख नवीन केसेस समोर येत आहेत.

याआधीही इस्त्राइलमधील संशोधकांनी एड्सवर उपचाराचे औषध शोधल्याचा दावा केला होता. पण याबाबत पुढे काही खास झाले नाही. एका मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित बातमीनुसार, संशोधकांनी दावा केला होता की, त्यांनी एक असे औषध तयार केले आहे ज्याने एचआयव्ही एड्सच्या पेशी नष्ट केल्या जाऊ शकतात. महत्त्वाची बाब म्हणजे इस्त्राइलच्या संशोधकांनी या औषधाचे पेटेंट करण्याचाही प्रयत्न केला होता.