‘कोरोना’च्या संकटामध्येच आली आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी ! मिळालं HIV चं औषध, आता ‘एड्स’वर होणार उपचार

पोलिसनामा ऑनलाईन टीम – जगभरात एड्स झालेल्या रुग्णांची संख्या कोट्यवधींमध्ये आहे. अद्यापही त्यावर कोणतेही लस किंवा औषध नसल्यामुळे गेल्या काही वर्षात लाखो लोकांचा जीव गेला, यात सर्वाधिक संख्या लहान मुलांची आहे. मात्र आता पहिल्यांदाच एड्स रोगावर उपचार करणारे औषध मिळाल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. फेडरल युनिव्हर्सिटी ऑफ साओ पाउलोच्या संशोधकांच्या म्हणण्यानुसार, ब्राझीलचा एका एचआयव्ही पॉझिटिव्ह व्यक्तीला औषधांचे मिश्रण देण्यात आले. या मिश्रणामुळे ही व्यक्ती एड्समुक्त झाली आहे.

एचआयव्ही ग्रस्त व्यक्तीला अनेक अँटीरेट्रोव्हायरल औषधे आणि निकोटीनामाइड औषधांचे मिश्रण दिले गेले होते. गोपनीयता कायद्यामुळे रुग्णाचे नाव जाहीर करता येत नसून लवकरच जागतिक आरोग्य संघटनेला याबाबत माहिती देण्यात येईल. शास्त्रज्ञांच्या टीमने एड्स-2020 नावाच्या ऑनलाइन कॉन्फरन्समध्ये एड्स रूग्णाला बरे केल्याचा दावा करून सर्वांना चकित केले. संशोधक डॉ. रिकार्डो डियाज यांनी सांगितले की, हा ब्राझिलियन माणूस ऑक्टोबर 2012 मध्ये पॉझिटिव्ह आढळला होता.

रुग्णाने एड्सच्या उपचार दरम्यान देण्यात आलेली औषधे घेणे बंद केले होते. संशोधनादरम्यान, रुग्णाला दोन महिन्यांनी अँटीरेट्रोव्हायरल औषधे आणि निकोटिनामाइड औषधांचे मिश्रण दिले. एक वर्षानंतर, जेव्हा रुग्णाची रक्त तपासणी केली गेली, तेव्हा त्याचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. स्टेम सेल प्रत्यारोपणाशिवाय एचआयव्ही बरा झाला. यापूर्वी स्टेम सेल प्रत्यारोपणाने लंडनमधील एक व्यक्ती निरोगी झाला होता. संशोधक अ‍ॅडम कॅस्टालिजाच्या मते, रुग्ण जिवंत आणि व्हायरस मुक्त आहे. हे सिद्ध करते की एड्सवर उपचार केले जाऊ शकतात.