पुण्यात रात्री 9 ते पहाटे 5 पर्यंत संचारबंदी, आज पासून 30 दिवस लागू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पाचवा लॉकडाऊन आजपासून सुरू झाल्यानंतर शहरात महिनाभर (दि. १ ते ३०) रात्री ९ ते सकाळी ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला रस्त्यावर फिरण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्याशिवाय मोटार, दुचाकी वाहने चालविणे, गल्लोगल्ली थांबण्यास मनाई करण्यात आली आहे. सहपोलिस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी हे आदेश दिले आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने आजपासून लॉकडाऊनचा पाचवा टप्पा सुरू झाला आहे. पण यात मोठ्या प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे.त्यानुसार ठराविक दुकाने वगळता इतर आस्थापना सुरू करण्यात आल्या आहेत. त्यानुसार आजपासून ( दि.१ ते ३०) जूनअखेर पर्यंत रात्री ९ ते सकाळी ५ वाजेपर्यंत संचारबंदीचा निर्णय लागू करण्यात आला आहे.

नागरिकांना आता रात्री फिरता येणार नाही. रात्री नऊ वाजेनंतर रस्त्यावर विनाकारण भटकंती करणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. नॉन कंटेन्मेंट आणि कंटेन्मेंट झोनमध्ये हा संचारबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार शहरातील नागरिकांना आता ३० जूनपर्यंत दररोज रात्री ९ ते सकाळी ५ वाजेपर्यंत कोणत्याही कारणास्तव बाहेर पडता येणार नाही. अन्यथा कडक कारवाई करण्याचा इशारा डॉ. शिसवे यांनी दिला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like