दसर्‍यानंतर 1 कोटींच्या नोटांनी सजवली देवी, जाणून घ्या काय होते पैशांचे पूजेनंतर (व्हिडीओ)

हैद्राबाद : दक्षिण भारतीय राज्य तेलंगनाच्या एका मंदिरात दसर्‍यानिमित्त देवीला एक कोटी रूपयांच्या नोटांनी सजवण्यात आले. तेलंगनाची कन्या परमेश्वरी देवी मंदिरात या नोटांना फुलांचा आकार देऊन सजवण्यात आले होते. इतक्या मोठ्याप्रमाणात नोटांचा वापर करून त्या देवीला अर्पण केल्याचे वृत्त सोशल मीडियावर खुप वायरल होत आहे.

एनडीटीव्हीवर प्रकाशित एका रिपोर्टनुसार, देवीचा पूर्ण श्रृंगार नोटांनी करण्यात आला होता. माळेपासून समोर ठेवलेली फुल सर्वकाही नोटांपासून बनवले होते. मंदिरात अन्य देवी-देवतांना नोटांचे हार घालण्यात आले होते.

मंदिराचे कोषाध्यक्ष पी रामू यांच्यानुसार, मागच्या वर्षी तर मंदिरात देवीच्या पूजेत तीन कोटीपेक्षा जास्त नोटांचा वापर करण्यात आला होता. त्यांनी म्हटले, कोरोना व्हायरस महामारीच्या दरम्यान निर्माण झालेल्या आर्थिक तंगीमुळे असे झाले. या नोटा स्थानिक लोक पूजेसाठी देतात. पूजा संपन्न झाल्यानंतर या नोटा त्यांना परत केल्या जातात. या वर्षी देवीच्या सजावटीसाठी 40-50 लोकांनी पैसे दिले होते.

देवीची पूजा वर्षभरात विविध रूपात केली जाते. मंदिरात ज्या देवीचा श्रृंगार नोटांनी केला गेला तिला धनलक्ष्मी म्हटले जाते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like