अमेरिकेबरोबरच ‘या’ देशात चालते ‘राम’ नावचे ‘चलन’, ‘नोटे’वर आहे प्रभु रामाचा ‘फोटो’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राम नाव असलेले चलन नेदरलँड आणि अमेरिकेत वापरले जाते. परंतू ही मुद्रा तेथील अधिकृत मुद्रा मानली जात नाही. हे चलन एका खास वर्तुळात प्रचलित आहे. हे या दोन्ही देशातील चलन आहे. या नोटेवर प्रभू रामचंद्राचा फोटो आहे.

अमेरिकेतील एका राज्यात आयोवामध्ये एका समुदायात ही राम मुद्रा चालते. येथे अमेरिकन जनजाती आयवाचे लोक राहतात. अमेरिकन समाजातील हे लोक महर्षी महेश योगींना मानतात. महर्षी वैदिक सिटी मध्ये असलेले अनुयायी कामांच्या स्वरुपात या मुद्रेद्वारे व्यवहार करतात. 2002 मध्ये ‘द ग्लोबल कंट्री वर्ल्ड पीस’ नावाच्या एका संस्थेने या मुद्रेला जारी केले आहे आणि समर्थकांमध्ये वाटले आहे.

कोन आहेत महर्षी महेश योगी –
महर्षी महेश योगी छत्तीसगढ राज्यात जन्माला आले. त्याचे खरे नाव महेश प्रसाद वर्मा आहे. त्यांनी फिजिक्समध्ये उच्च शिक्षण घेऊन शंकराचार्य ब्रह्मानन्द सरस्वती यांच्याकडून दीक्षा घेतली. यानंतर त्यांनी परदेशात आपला प्रचार केला. त्यांचे भावातीत ध्यान (transcendental meditation) परदेशात खूपच लोकप्रिय आहे.

रॉक ग्रुप बीटल्स अनुयायी झाले –
Let it be गाणे असलेले बीटल्सचे सदस्य करिअरच्या दरम्यान काम सोडून भारतात आले. त्यांना महेश योगी यांच्याबरोबर वेळ व्यतित केला. यानंतर योगींची ख्याती वाढली. त्या दरम्यान योग, ध्यान आणि आयुर्वेदिक उपाय याची पद्धत जगभरात लोकप्रिय झाली.

नाही मिळाले लीगल टेंडर –
24 फेब्रवारी 2002 मध्ये राम मुद्रेच्या व्यवहारास सुरुवात केली. वैदिक सिटीच्या आर्थिक आणि सांस्कृतिक विकासासाठी अमेरिकी सिटी कौन्सिलने या मुद्रेचा स्वीकार तर केला. परंतू लीगल टेंडर देण्यात आला नाही. 35 अमेरिकन राज्यात रामावर आधारित बॉन्ड चालतो.

राम मुद्रेची किंमत –
एका राम मुद्रेची किंमत 10 अमेरिकान डॉलर निश्चित करण्यात आली आहे. या प्रकारच्या तीन नोटांचे मुद्रण करण्यात आले, ज्या नोटेवर एक राम, त्याचे मूल्य 10 डॉलर, ज्यावर दोन राम त्याची किंमत 20 डॉलर आणि त्यावर तीन फोटो 20 अमेरिकन डॉलरच्या बरोबर असेल. आश्रम मधील सदस्यांचा वापर एकमेकांत केला जातो.

नेदरलँड मध्ये राम मुद्राला कायदेशीर मान्यता –
नेदरलँडमध्ये राम मुद्राला कायदेशीर मान्यता मिळाली आहे. येथे रामाचा एक फोटो असलेल्या मुद्रेची किंमत 10 यूरो आहे. डच सेंट्रल बँकेनुसार या वेळी नेदरलँडमध्ये जवळपास एक लाख राम मुद्रा चलनात आहेत, लोकांनी बँकेत जाऊन मुद्रा बदलल्यास 10 यूरो घेऊ शकतात.

यूनिव्हर्सिटी ऑफ टेक्सासच्या भारतीय मूळ असलेले प्रोफेसर पंकज जैन यांनी लिहिले आहे की वैदिक सिटी ने वैदिक पद्धतीने शेती आणि आरोग्याच्या सुविधा याचे वैदिक मुल्य वाढवण्यासाठी राम मुद्राचे चलन सुरु केले. मागील वर्षाच्या शेवटी सोशल मिडियावर चलनावरुन बरीच चर्चा झाली होती की परदेशात चलनावर तर अनेकांचे फोटो असता मात्र भारतात फक्त गांधीजींची मुद्रा असलेला फोटो का? अनेक लोकांनी भारतात राम मुद्रेची सुरुवात करावी अशी देखील इच्छा व्यक्त केली.

Visit : Policenama.com