Curry Leaves For Hair | कढीपत्त्याने केसांची समस्या होते दूर, जाणून घ्या वापरायची पद्धत

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Curry Leaves For Hair | काही दिवसांपूर्वी एका मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात आले होते की, पाण्यातील जास्त टीडीएसमुळे लोकांचे केस गळत आहेत. अशीच समस्या अनेक दिवसांपासून लोकांना भेडसावत आहे. आजकाल लोकांचे केस लहान वयात पांढरे होत आहेत. याशिवाय अनेकांना कोंड्याची (Curry Leaves For Hair) समस्याही भेडसावत आहे. या सर्व समस्या दूर करण्यासाठी तुम्हाला फक्त कढीपत्ता (Curry Patta For Hair) वापरावा लागेल. होय, यामध्ये अँटिबॅक्टेरियल गुणधर्म आहेत, ज्याच्या मदतीने केस गळणे थांबते आणि कोंड्याची समस्याही संपते (Hair Care Tricks).

 

केसांसाठी कडीपत्त्याचे फायदे (Benefits Of Curry Leaves On Hair)

१. केस वाढतील
केसांच्या वाढीसाठी कढीपत्ता खूप फायदेशीर मानला जातो. केसांच्या वाढीसाठी कढीपत्त्यासोबत मेथी आणि आवळा (Amla) घ्या. लक्षात ठेवा, मूठभर कढीपत्त्यात मेथीची पाने समप्रमाणात घ्या. त्यात एक आवळा बारीक करून घ्या. आवळा पावडरदेखील वापरू शकता. हे बारीक करण्यासाठी अर्धा चमचा पाणी मिसळा. अर्धा तास केसांवर ठेवा आणि नंतर धुवा.

 

२. डँड्रफ (Dandruff) साठी
कढीपत्त्यात बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात. त्याच्या मदतीने केसांमधील कोंडा दूर करता येऊ शकतो. यासाठी दह्यात कढीपत्ता मिसळून लावा. यासाठी मूठभर कढीपत्ता बारीक करून त्यात २ चमचे दही मिसळा. १५ ते २० मिनिटे केसांना लावून ठेवा आणि नंतर धुवा. (Curry Leaves For Hair)

३. हेअर डॅमेज करेल कंट्रोल
जर तुमचे केस खूप कोरडे, निर्जीव आणि डॅमेज असतील तर तुम्ही कढीपत्ता वापरू शकता. यासाठी एका भांड्यात खोबरेल तेल (Coconut Oil) गरम करून त्यात थोडा कढीपत्ता टाकून गरम करा. कढीपत्ता काळा पडल्यावर गॅस बंद करा आणि तेल थंड होऊ द्या. आंघोळीच्या एक तास आधी तेल थोडे गरम करून डोक्याला मसाज करून डोके धुवा.

 

४. केसगळती थांबेल
जर तुमचे केस सतत गळत असतील तर या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही कढीपत्ता वापरू शकता. यासाठी खोबरेल तेलात कढीपत्ता उकळवा आणि त्यात मेथीदाणे टाका, त्यानंतर आठवड्यातून एकदा या तेलाने तुमच्या स्काल्पची मालिश करा आणि एक ते दीड तासांनी केस धुवा. रात्रीही हे तेल लावून झोपू शकता.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Curry Leaves For Hair | curry leaves benefits for hairfall hair care tips

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

CM Eknath Shinde | ‘बोम्मईंच्या नावानं खोटं ट्विट, त्यामागे कोणता पक्ष हेही समजले’, मुख्यमंत्र्यांची सभागृहात माहिती

Bank Rules Change | १ जानेवारीपासून बदलणार बँकेचे हे नियम, जाणून घ्या तुमच्यावर कोणता परिणाम होणार

Ankita Lokhande | टीव्ही इंडस्ट्रीची प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडेचे बोल्ड फोटो होताहेत व्हायरल