कढीपत्त्याचा वापर करून मिळवा केसगळती आणि कोड्यांपासून कायमची सुटका, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – आजकालच्या आधुनिक जीवनात केसगळती, केसात कोंडा होणे आणि केस पातळ होण्याच्या समस्या अगदी सामान्य झाल्या आहेत. केस अकाली पांढरे पडण्याची समस्या सुद्धा वाढताना दिसत आहे. चिंता, हार्मोन्सचे असंतुलन, खाण्या पिण्याच्या अयोग्य सवयी आणि वेळा हे केसगळतीची प्रमुख कारण आहे. त्यासाठी तुमच्या आहारात बदल करणे सर्वात महत्वाचं पाऊल आहे. अशात कढीपत्ता तुमच्या केसांच्या वेगवगेळ्या समस्या दूर करु शकतो. कढीपत्त्याने केसांना मजबुती तर मिळतेच, सोबत केस चमकदारही होतात.

कढीपत्त्याचे फायदे

कढीपत्त्या मध्ये असलेल्या व्हिटॅमिन मुळे केस गळती होण्याचे प्रमाण कमी होते तसेच केस मजबूत होतात. यातील अमिनो अ‍ॅसिड केसांच्या फॉलिकल्सला मजबूत करतं. तेच बेटा- कॅरोटीन, प्रोटीन केसांचं आरोग्य चांगलं ठेवतं आणि केस चमदार होतात, कढीपत्त्या अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल, अ‍ॅंटी-फंगल, अ‍ॅंटी-इंफ्लेमेटरी गुण असतात. त्याने केसांत होणारी कोंड्याची समस्या लगेच दूर होते.

कसा करायचा वापर

१. खोबरेल तेलात कढीपत्त्याची ७ ते ८ पाने टाकून तेल कोमट करा. हे तेल डोक्याच्या त्वचेवर व्यवस्थित लावा. रात्रभर केसांना तेल तसेच राहूद्या. सकाळी केस पाण्याने व शॅम्पूने धुवून टाका.

२. खोबऱ्याच्या तेलात काही कढीपत्त्याची पाने आणि ५ ते ६ मेथीचे दाणे टाकून तेल गरम करा. नंतर तेल थंड झाल्यावर केसांना लावा.

३. ताजी कढीपत्त्याची पाने पेस्ट करून दह्यात टाका आणि त्यात काही ऑलिव ऑइलचे किंवा बदामाच्या तेलाचे थेंब टाका. हे मिश्रण केसांसाठी फायदेशीर ठरतं. आता ही पेस्ट केसांना व्यवस्थित लावा आणि २० ते २५ मिनिटांनी केस शॅम्पूने धुवावे.

४. कढीपत्त्याची पाने भाजा आणि तुम्ही वापरता त्या हेअर ऑइलमध्ये बारीक करून मिश्रित करा. हे तेल रोज डोक्याच्या त्वचेला लावून झोपा. सकाळी केस कोमट पाण्याने धुवा.