पोलिस कोठडीतील मृत्यू प्रकरण ; ‘बडतर्फ’ IPS संजीव भट्ट आणि त्यांच्या सहकार्‍यांना ‘जन्मठेप’

अहमदाबाद : वृत्तसंस्था – ३० वर्षांपुर्वीच्या कस्टडीयल डेथ प्रकरणात गुजरातचे बडतर्फ आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांना जामनगर न्यायालयाने दोषी ठरविले असून संजीव भट्ट यांना न्यायायाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

काय आहे प्रकरण ?

१९९० साली भट्ट हे जामनगरचे एसपी होते. त्यावेळी झालेल्या भारत बंद दरम्यान हिंसाचार झाला होता. या हिंसाचारप्रकऱणी पोलिसांनी १३३ लोकांना ताब्यात घेतले होते. त्यात २५ लोक जखमी झाले होते. तर ८ जणांना रुग्णालायात दाखल करण्यात आले होते.

संशयिताचा कस्टडीत मृत्यू

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या प्रभुदास माधवजी वैश्वानी यांचा मृत्यू झाला होता. त्यांना पोलिसांच्या कस्टडीत असताना मारहाण केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी संजीव भट्ट यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला होता. मात्र गुजरात सरकारने हा खटला चालविण्याची परवानगी दिली नव्हती. २०११ मध्ये राज्य सरकारने हा खटला चालविण्याची परवानगी दिली होती.

भट्ट यांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका

भट्ट यांना न्यायालयाने दणका दिला आहे. ३० वर्षांपुर्वीच्या कस्टोडीयल डेथप्रकरणी कनिष्ठ न्यायालयात सुनावणी पुन्हा सुरु न करण्याची त्यांची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती. या प्रकरणाची सुनावणी जामनगरच्या न्यायालयात २० जून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने आज झाली.

संजीव भट्ट दोषी

आज झालेल्या सुनावणीत संजीव भट्ट यांना न्यायालयाने भादंवि ३०२ नुसार दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

 

आरोग्यविषयक वृत्त –

योग्य पद्धतीने बटाटा खा आणि वजन नियंत्रणात ठेवा

नैसर्गिक पद्धतीने करा हार्मोन्स बॅलन्स

अचानक येणारा हृदयविकाराचा झटका रोखता येऊ शकतो

कोणत्याही गोष्टीच टेंन्शन घेण्याअगोदर स्वतःचा विचार करा