‘या’ प्रकरणात : नगरसेवक कलाटे यांना अटकपुर्व जामीन

पुणे: पोलीसनामा ऑनलाईन : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील उपअभियंत्याला शिवीगाळ व मारहाण करत सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी नगरसेवक राहुल कलाटे यांना अतिरिक्त सत्र न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

महापालिकेतील राहूल कलाटे यांच्या टिडीआर फाईलवर सही का केली नाही म्हणून त्यांनी बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम निर्मंलन विभागाचे उपअभियंता (स्थापत्य) अनिल महादेव राऊत (वय 52, रा. चिंचवड) यांना 11 फेब्रुवारी रोजी शिवीगाळ करत मारहाण केली होती. त्यानंतर नगरसेवक कलाटे आणि विनोद मोरे यांनी शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी ऍड. एस. के. जैन आणि ऍड. अमोल डांगे यांच्यामार्फत अर्ज करण्यात आला होता. त्यानुसार न्यायालयाने कलाटे यांना 20 हजार रुपयांच्या जातमुचलक्‍यावर जामीन मंजूर केला.

अमोल कोल्हे शुक्रवारी करणार ‘या’ पक्षात प्रवेश ?