Lockdown : औरंगाबादमध्ये धार्मिक स्थळामधून 13 परप्रांतीय नागरिक ताब्यात

पोलिसनामा ऑनलाईन टीम – देशासह विविध राज्यात लॉकडाउनमध्येही भटकंती केल्यामुळे कोरोना वेगाने पसरला आहे. विशेषतःदिल्लीतील निजामुद्दीन भागातील मरकजच्या कार्यक्रमानंतर ठिकठिकाणी कोरोना व्हायरस वाढला आहे. त्यातच औरंगाबाद रस्त्यालगत असणार्या अकबरनगर येथे एका मशीदीत 13 परप्रांतीय नागरिक आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
नगर-औरंगाबाद रस्त्यावर असलेल्या अकबरनगरमधील एका प्रार्थनास्थळात काही लोक वास्तव्यास असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांना मिळाली. त्यानुसार तेथे छापा टाकून 13 परप्रांतीयांना ताब्यात घेतले. हे सर्व नागरिक हे मध्य प्रदेशातील आहेत. ते दिल्लीतील मरकजच्या कार्यक्रमानंतर जानेवारीत शहरात आले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. याबाबत तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दुसरीकडे अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णाची संख्या वाढली आहे.
मरकजच्या कार्यक्रमानंतर निजामुद्दीन भागातून अनेक जण जिल्ह्यात आले होते. ता जामखेडमधील मशिदीत काही परदेशी नागरिक लपून बसल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्यामुळे त्यांनी तेथे जाऊन पाहणी केली असता आयव्हरी कोस्ट आणि फ्रान्समधील नागरिक वास्तव्यास असल्याचे दिसून आले. त्यांची तपासणी केली असता त्यातील तिघेही कोरोना बाधित असल्याचे आढळून आले. संगमनेर, नेवासे, राहुरी, नगर शहरातील मुकुंदनगर भागातून अनेज तबलीकी ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर स्वत:हून तबलीग जमातच्या कार्यक्रमाशी जे निगडित आहेत, त्यांनी स्वत:हून पुढे येण्याचे आवाहन केले. मात्र त्यानंतर तब्बल पंधरा दिवसांनंतर अकबरनगर येथील प्रार्थनास्थळात परप्रांतीय आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.