दुबईहून तस्करी करून आणलेले ३१ लाखांचे सोने पुणे विमानतळावर पकडले

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – दुबईहून आलेल्या विमानातून तस्करी करून आणलेले ३१ लाख १३ हजार रुपये किंमतीचे ९५७ ग्रॅम सोन्यासह सीमा शुल्क विभागा(कस्टम) च्या पथकाने पुणे विमानतळावर एका प्रवशाला पकडले. त्याच्याकडून पकडलेले सोने हे एका पॉलिथीन पिशवीमध्ये पेस्ट अवस्थेत मिळून आले.

बाबा मिया मोमीन असे पकडलेल्याचे नाव आहे.

सोमवारी सकाळी दुबईहून आलेले विमान आय़ एक्स २१२ पुणे विमानतळावर उतरले. त्यावेळी प्रवाशांच्या साहित्याची तपासणी करत असताना सीमा शुल्क (कस्टम) विभागाच्या अधिकाऱ्यांनी संशयावरून शहेजाद बाबा मिय़ा खान याची झडती घेतली. तेव्हा त्याच्याकडे एका पातळ पॉलिथीन बॅगमध्ये ठेवलेले पेस्ट च्या स्वरुपात सोने आढळून आले. पथकाने त्याच्याकडून ते सोने हस्तगत केले. त्या सोन्याची किंमत ३१ लाख १३ हजार ४४६ रुपये असून त्याचे वजन ९५७. १० ग्रॅम आहे.

सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोनं जप्त करून शेहजाद खान याच्यावर कस्टम अक्ट १९६२ च्या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.