पुणे विमानतळावर दुबईहून तस्करी करून आणलेले ५३ लाखांचे सोने जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – दुबईहून सकाळी पुण्यात आलेल्या विमानाच्या वाश बेसीनमधून आणलेले सीमा शुल्क विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनीटच्या पथकाने १४ सोन्याचे बिस्किट जप्त केले आहेत. या सोन्याचे कींमत ५२ लाख ९९ हजार रुपये आहे.

दुबईहून पुण्याला येणारे जेट एअरवेजचे एसजी ५२ हे विमान आज पहाटे पुणे विमानतळावर उतरले. या विमानाच्या आतील वाश बेसीनजवळच्या एका खोबणीत पारदर्शक चिकटपट्टीने हे सनोच्याचे बिस्कीट चिकटविण्यात आले होते. सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी हे सोने जप्त केले. तेव्हा त्यात १४ सोन्याचे बिस्कीट होते. या बिस्कीटांवर विदेशातील सीरीयल मार्क होते. या सोन्याच्या बिस्कीटांची किंमत ५२ लाख ९९ हजार रुपये एवढी आहे.

ही कारवाई कस्टमचे उपायुक्त महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक्षक माधव पलीनीतकर, विनीता पुसदकर, निरीक्षक बालासाहेब हगवणे, चैतन्य जोशी आणि आश्विनी देशमुख, तसेच हवालदार संदिप भंडारी आणि ए. एस. पवळे यांच्या पथकाने केली.

सिने जगत –

अभिनेत्री प्रियंका चोपडा सलमान खानच्या ‘भारत’ चित्रपटाबाबत मोठं वक्‍तव्य

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ‘भयंकर’ चिडली, ‘त्या’ प्रियकराबाबत केला मोठा खुलासा

‘या’ 3 ‘बोल्ड’ अभिनेत्रींनी ‘लव्ह’ मॅरेज केल्यानंतर पतीवर केले लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप

‘या’ ४ ‘टॉप’च्या अभिनेत्रींना ‘सुंदर’ दिसण्यासाठी ‘मेकअप’ची अजिबात नाही गरज