प्लास्टिक कॅरिबॅग मागितल्याने दुकानदारांकडून ग्राहकाला बेदम मारहाण

पिंपरी-चिंचवड  : पोलीसनामा आॅनलाईन

पिंपरी-चिंचवड शहरात ग्राहकाने प्लास्टिक कॅरिबॅग मागितल्याच्या कारणावरून बेकारी दुकानदाराने लाकडाच्या बांबूने ग्राहकाला बेदम मारहाण केल्याची घटना पिंपरी-चिंचवड शहरात घडली आहे. याप्रकरणी पिंपरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटने प्रकरणी पिंपरी पोलिसात ग्राहक मॅनवेल झेवियर दास वय-३४ रा.मासूळ वसाहत,यांनी फिर्याद दिली आहे.त्यानुसार बेकारी दुकानदार नसरुद्दीन अन्सारी वय-२७ रा.नेहरू नगर याच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अद्याप संबंधित संशयित आरोपीना ताब्यात घेण्यात आले नाही.याचा तपास पिंपरी पोलीस करत आहेत.

[amazon_link asins=’B074PQ6DF7′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8b090a40-7c60-11e8-82b1-61706d972864′]

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी मॅनवेल झेवियर दास हे शुक्रवारी सकाळी नऊ च्या सुमारास उद्यम नगर येथील ओव्हन फ्रेश बेकारी येथे खारी आणि टोस्ट आणण्यासाठी गेले होते.हे सर्व खरेदी केल्यानंतर ग्राहक मॅनवेल यांनी दुकानदार याच्याकडे प्लाष्टीक कॅरिबॅगची मागणी केली मात्र यावर दोघांमध्ये बराच वेळ वाद झाला आणि अखेर दुकानदार नसरुद्दीनसह तीन कामगारांनी ग्राहक मॅनवेल यांना लाकडाच्या बांबूने डोक्यात बेदम मारहाण केली.या घटनेत ते गंभीर जखमी झाले आहेत.याविषयी त्यांनी पिंपरी पोलिसात फिर्याद दिली आहे,त्यानुसार दुकानदार नसरुद्दीनसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अद्याप याप्रकरणी कोणालाही अटक नाही.