Customer Care Number साठी तुम्ही सुद्धा करत असाल Google Search तर रिकामा होऊ शकतो खिसा! हॅकर्सचे लक्ष तुमच्या बँक खात्यावर
नवी दिल्ली : Customer Care Number | जर तुम्ही सुद्धा देशातील मोठ्या बँकेत खातेधारक असाल आणि आपल्या शाखेचा कस्टमर केयर नंबर (Customer Care Number) गुगलवर शोधत (Google Search) असाल, तर असे करू नका. तुमची समस्या सोडवण्यासाठी तुम्ही जो नंबर शोधत आहात तो तुमच्या समस्या आणखी वाढवू शकतो.
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक SBI ने आपल्या 40 कोटीपेक्षा जास्त ग्राहकांना काही दिवसांपूर्वीच याबाबत अलर्ट जारी केला होता. बँकेचे म्हणणे आहे की, इंटरनेटवर एसबीआयचा कस्टमर केयर नंबर (SBI Customer Care Number) सर्च केल्यानंतर जो नंबर येतो, त्यामध्ये बहुतांश बनावट असतात.
जर तुम्ही या बनावट नंबरवर कॉल केला तर तुमच्याकडून देण्यात आलेल्या माहितीद्वारे तुम्ही फसवणुकीला बळी पडू शकता. ग्राहकांना अलर्ट करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने एक अॅडव्हायजरी जारी केली आहे. (Customer Care Number)
एसबीआयच्या अॅडव्हायजरी काय म्हटले आहे जाणून घेवूयात…
– बँकेच्या ऑफिशियल वेबसाइटवर जाऊन तेथून नंबर घ्या.
– कस्टमर केयरवर सर्व डिटेल देऊ नका.
– इंटरनेटवरील बनावट ई-मेल आयडीपासून सावध राहा.
– सायबर गुन्हेगारांनी एसबीआय, पीएनबी, अॅक्सिस आणि एचडीएफसीचे बनावट कस्टमर केयर नंबर इंटरनेटवर अपलोड केल आहेत. याद्वारे ते फसवणूक करतात.
योग्य माहिती आणि सतर्कता, बचावाचा उपाय
बँकेची अधिकृत वेबसाइट आणि कागदपत्रांर कस्टमर केयर नंबर नमूद असतो, त्याचा वापर करा.
थोडा जरी संशय आला तरी ताबडतोब केंद्र सरकारचा स्पेशल सायबर गुन्हे
विरोधी तक्रार क्रमांक 155260 वर कॉल करा आणि पूर्ण माहिती द्या. नेहमी सतर्क राहा.
Web Title :- Customer Care Number | google search for customer care numbers can lead to bankruptcy your bank account can be hacked
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- BOB Recruitment 2021 | बँक ऑफ बडौदा करणार ‘या’ पदांसाठी मुंबई, नागपुरात बंपर भरती; जाणून घ्या सविस्तर
- Diego Maradona | दिवंगत फुटबॉलपट्टू दिएगो मॅराडोना यांच्यावर क्युबाच्या महिलेकडून अत्यंत गंभीर आरोप
- IND Vs NZ Test Series | कानपूरमधील खेळपट्टी खराब, जाणून घ्या कोणी केली तक्रार