फक्त एक चुकीचं Google Search आणि महिलेचा सर्व बँक ‘बॅलन्स’ गायब !

बंगळूर : वृत्तसंस्था – आपल्यापैकी अनेकजण प्रत्येक प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी गुगलचा प्रभावीपणे वापर करत असतात. पण गुगल सर्चवर केलेल्या एका चुकीमुळे बंगळुरुमधील एका महिलेने आपल्या बँक खात्यातील सगळा बॅलन्स गमावल्याची घटना घडली. आजकाल फसवणूक करणारे भामटे फसवणुकीच्या पारंपारिक पद्धतींपेक्षा नवनवीन साधनांचा वापर करत असून यावेळी या टोळ्यांनी Google Search चा शस्त्र म्हणून वापर केला आहे.
Cyber-Attack
अशी झाली फसवणूक :
अलीकडेच, बेंगलुरूच्या एका महिलेने जेव्हा ‘झोमॅटो’वर ग्राहक सेवा क्रमांक न मिळाल्याने Google वर शोध घेतला. गुगल सर्च नंतर मिळालेल्या नंबरवर त्या स्त्रीने त्यावर कॉल करून जेवत मागवताना जास्तीच्या पैशांची कपात झाल्याने परताव्याची विनंती केली. या प्रक्रियेत, महिलेने तिच्या बँक खात्याची सर्व माहिती दिली आणि काही मिनिटांतच तिचा बँक बॅलन्स झिरो झाला. वास्तविक, Google शोध वर दर्शविलेला झोमॅटो कस्टमर केअरचा नंबर बनावट होता. झोमॅटोच्या वतीने या बनावट कॉल सेंटरविरूद्ध पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आली आहे.

याप्रमाणे बनावट ग्राहक सेवा नंबरच्या बाबतीत चेन्नई येथील एक महिला देखील फसवणूकीचा बळी ठरली. जेव्हा महिलेने चुकून एक बनावट ग्राहक सेवा क्रमांकाला कॉल केला तेव्हा फसवणूक करणार्‍याने महिलेला बँक खात्याचा पासवर्ड विचारला असता फसवणूकीचा संशय आल्याने तिने चुकीचा पिन सांगितला. हा फोन संपल्यानंतर लगेचच चुकीचा पासवर्ड मिळाल्यामुळे ५००० आणि १०,००० रुपयांचे दोन व्यवहार अयशस्वी झाल्याचा संदेश आला.

यापूर्वी मुंबईतही असेच एक प्रकरण समोर आले होते. फसव्या लोकांनी गुगल सर्चवरील ईपीएफओ ऑफिस नंबर बदलला होता. जेव्हा लोक त्या क्रमांकावर कॉल करत, तेव्हा त्यांच्या बँकेचा गुप्त तपशील विचारून ते त्यांच्या खात्यावरुन पैसे काढत. बरेच लोक या प्रकारच्या फसवणूकीला बळी पडले.

अशा प्रकारे बदलली जाते माहिती :
गुगल आणि गुगल मॅपवर नंबर बदलण्याचा पर्याय आहे, जेणेकरून कोणताही वापरकर्ता तिथे जाऊन दुकान, बँक किंवा संस्थाचा नंबर बदलू शकेल. तथापि, आता या सुविधेचा गैरवापर केला जात आहे म्हणून Google कडून प्राप्त झालेल्या प्रत्येक माहितीवर आंधळेपणाने विश्वास न ठेवता नेहमी सतर्क राहणे गरजेचे आहे. कोणतीही माहिती आपण अधिकृत वेबसाईट वरून तपासून पाहणे गरजेचे आहे तसेच आपली गोपनीय माहिती कोणालाही माहित होणार नाही याची काळजी घेणे देखील आवश्यक आहे.

आरोग्यविषयक वृत्त –