‘या’ बँकेच्या ATM मध्ये नाही मिळणार 2000 च्या नोटा ! घेण्यात आला मोठा निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एटीएमम वापरकर्त्यांसाठी महत्वाची बातमी असून लवकरच एटीएममधून दोन हजार रुपयांच्या नोटा मिळणार नसल्याचे समजते. दरम्यान, सध्या केवळ इंडियन बँकेने हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार इंडियन बँक आपल्या एटीएममध्ये दोन हजार रुपयांच्या नोटा ठेवणार नाहीत. या संदर्भात बँकेने आपल्या सर्व शाखांना माहिती दिली असून इंडियन बँकेने आपल्या ग्राहकांच्या सोयीसाठी हा निर्णय घेतल्याचे समजते.

1 मार्चपासून 2 हजार रुपयांच्या नोटा मिळणार नाहीत :
इंडियन बँकेने दिलेल्या माहितीनुसार, दोन हजार रुपयांच्या नोटा एटीएम मधून काढल्यानंतर ग्राहकांना किरकोळ दुकानात आणि इतर ठिकाणी व्यवहार करण्यात अडचण येते. यासंदर्भात बँकेने 17 फेब्रुवारी रोजी एक परिपत्रकही जारी केले आहे. त्यात म्हटले की, 1 मार्च 2020 पासून इंडियन बँकेच्या एटीएममध्ये 2 हजार रुपयांच्या नोटा असलेल्या कॅसेट डिसेबल केल्या जातील.

200 रुपयांच्या नोटांची संख्या वाढविली जाणार :
बँकेने हे देखील स्पष्ट केले कि, शाखेत 2,000 हजार रुपयांच्या नोटा उपलब्ध होतील. जर एखादा ग्राहक बँकेतून पैसे काढत असेल तर त्याला 2000 रुपयांच्या नोटा दिल्या जाऊ शकतात. बँकेने सांगितले की ग्राहक दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी शाखेत येत आहेत. अशा ग्राहकांना एटीएम सेवा देण्यास काही अर्थ नाही. हे लक्षात घेऊन बँकेने निर्णय घेतला आहे की एटीएम मशीनमध्ये 200 रुपयांच्या नोटांच्या कॅसेटची संख्या वाढविली जाईल.

दरम्यान, इतर कोणत्याही बँकेने असा निर्णय घेतला नाही, इंडियन बँकेने एटीएममध्ये 2 हजार रुपयांच्या नोटा न ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.अन्य कोणत्याही सरकारी किंवा खासगी बँकेने असा कोणताही निर्णय घेतला नाही. फायनान्शिअल सॉफ्टवेयर अँड सिस्टम्सचे अध्यक्ष व्ही बालासुब्रमण्यन यांचा हवाला देताना एका माध्यम अहवालात सांगितले कि, त्यांना यासंदर्भात कोणतीही माहिती दिली गेली नाही. ही कंपनी देशातील बर्‍याच बँकांच्या एटीएम सेवा व्यवस्थापित करते.