कस्टमकडून 1 कोटी 28 लाखांचे परकीय चलन जप्त

कोची : एका एजन्सीवर कस्टम्स विभागाने (Customs Dept ) छापा घालून तेथून १ कोटी २८ लाख रुपयांचे परकीय चलन जप्त करण्यात आले. केरळमधील त्रिशूर च्या गुरुवायूर येथील पूर्व नाडामधील एका परकीय चलन एक्सचेंज सेंटरवर ही कारवाई करण्यात आली. कस्टम विभागाने (Customs Dept ) या ठिकाणी बेकायदेशीरपणे ठेवलेले ४४ लाख ५६ हजार रुपयेही जप्त केले आहेत. या परकीय चलन एक्सचेंज एजन्सीकडे अशाप्रकारे चलन बदलून देण्याचे कोणतेही लायसन्स अथवा कागदपत्रे आढळून आली नाहीत़ असे कोचीचे कस्टम विभागाच्या आयुक्तांनी सांगितले.