नळदुर्ग-सोलापूर महामार्ग रस्त्यावर सीमा शुल्क विभागानं 425 किलो गांजा पकडला

नळदुर्ग : पोलीसनामा ऑनलाइन –   सोलापूर महामार्ग रस्त्यावर सीमा शुल्क विभागाने तबल सव्वा चारशे किलो गांजा पकडला आहे. आंध्र प्रदेशमधून हा गांजा महाराष्ट्रात आला असून, 65 लाखाहून अधिक किंमताचा हा गांजा आहे, असे सीमा शुल्क अधिकारी पी. के. बेहेरा यांनी दिली आहे.

आंध्रप्रदेशातून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामध्ये ट्रकमधून गांजाची विक्री होणार असल्याची माहिती सीमा शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने नळदुर्ग-सोलापूर महामार्गावर सापळा रचून ट्रकचालकाला ताब्यात घेतले. वाहनामध्ये तपासणी केली. त्यात २०६ पिशव्यांमध्ये ४१२ किलो गांजा असल्याचे मिळून आले. सीमा शुल्क विभागानेे ट्रक चालकाला ताब्यात घेतले.

त्याच्याकडे चौकशी करण्यात येत असल्याचे बेहेरा यांनी सांगितले. गांजा नेमका कुठे नेण्यात येत होता. तसेच तो गांजा नेमका कुने मागवला किंवा विक्री करण्यात येणार होता, याचा तपास करण्यात येत आहे.