राम कदम यांची जीभ छाटा आणि पाच लाखांचे बक्षीस मिळवा; माजी मंत्री

बुलडाणा: पोलीसनामा आॅनलाइन

भाजपचे आमदार राम कदम यांनी घाटकोपर येथील दहीहंडीच्या कार्यक्रमावेळी मुलींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यानंतर सर्व स्तरातून राम कदम यांच्या व्यक्तव्यावर संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यावरुन सुरु असलेला वाद थांबण्याचे नाव घेत नाहीये. दरम्यान, माजी मंत्री सुबोध सावजी यांनी राम कदमांची जीभ छाटा आणि पाच लाखांचे बक्षीस मिळवा असे चिथावणीखोर वक्तव्य केले आहे. त्यामुळे एका नव्या वादास सुरुवात झालीय.
[amazon_link asins=’B077RV8CCZ,B00WUGBBGY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’eb83f004-b1d6-11e8-bd59-7fad531fb4e4′]

राम कदम यांची जीभ छाटा आणि पाच लाख रुपये बक्षीस मिळवा, असे विधान सुबोध सावजी यांनी केल्याचे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने प्रसारित केले आहे. राम कदम यांनी दहीहंडी उत्सवावेळी ‘मुलगी तयार नसली तरीही तीला पळवून आणू’ असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. तेव्हापासून त्यांच्या वक्तव्यावर राज्यातील अनेक ठिकाणी निषेध नोंदविण्यात येत आहे. राज्यातील अनेक महिला संघटनांकडून त्यांच्या पोस्टरला चपलांचा मार देण्यात आला.

तसेच यापुढे महाराष्ट्रातून कोणत्याही मुलीचे अपहरण झाल्यास सर्वात अगोदर भाजपा आमदार राम कदम यांची चाैकशी करुन गुन्हा नोंदवण्यात यावा अशा अनेक संघटनांकडून तक्रारीही देण्यात आल्या. कदम यांच्या वक्तव्यावरुन विरोधकांनी मुख्यमंत्र्यांनाही लक्ष केले आहे. मुख्यमंत्र्यांनीही महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी अशी मागणी करण्यात येत होती. त्यानंतर राम कदम यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरुन माफीनामा जाहीर केला आहे. माफीनामा जाहिर केल्यानंतरही वाद संपण्याचे चित्र दिसत नाही.

हेही वाचा
वाचाळवीर राम कदम यांचे प्रवक्‍ते पद धोक्यात
मंत्रालयासमोर अंगावर रॉकेल ओतून महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न 
मुदतीपूर्वीच तेलंगणा विधानसभा बरखास्त 
तर… ‘ती’ ठरणार सर्वात कमी वयातील लिंग परिवर्तन शस्त्रक्रिया

जाहिरात