धक्कादायक ! माहीम बीचवरआढळली बेवारस सुटकेस, आतमध्ये हात-पायांचे तुकडे अन् ‘गुप्तांग’ आढळल्यानं प्रचंड ‘खळबळ’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – माहीमच्या समुद्र किनाऱ्यावर सापडलेल्या एका बेवारस सुटकेसमध्ये हाता-पायांचे तुकडे सापडल्यानं प्रचंड खळबळ उडाली आहे. काल सायंकाळी हा प्रकार समोर आला आहे. सुटकेसमधील मृतदेह हा पुरुषाचा असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

अशी सापडली सुटकेस
काही तरुणांना माहीम दर्ग्याच्या मागे एक सुटकेस सापडली. सुटकेस वजनानं जड वाटल्यानं त्यांनी ती उघडून पाहिली. यावेली तरुणांना धक्काच बसला. कारण त्यात हाता-पायांचे तुकडे आढळून आले. हे पाहून तरुण प्रचंड घाबरले. तरुणांनी ताबडतोब पोलिसांना याबाबत माहिती दिली. यानंतर माहीम पोलीस लगेचच घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी सुटकेस ताब्यात घेतली. या घटनेनं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

सुटकेसमध्ये दिसले हाता-पायांचे तुकडे आणि कापलेलं गुप्तांग
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर सुटकेस ही काळ्या रंगाची असून अमेरिकन टुरिस्टर कंपनीची आहे. पाण्यावर तरंगताना ही सुटकेस आढळून आली. यात एका पुरुषाचा खांद्यापासून कापलेला डावा हात आणि गुडघ्यापासून खाली कापलेला उजवा पाय तसेच प्लास्टिकच्या काळ्या पिशवीत पुरुषाचे कापलेलं गुप्तांग सापडलं आहे. या सुटकेसमध्ये इतर अंग म्हणजेच शीर आणि धड नसल्यानं हे हात आणि पाय कोणाचे आहेत हे अद्याप समजू शकलेलं नाही. सदर तुकडे वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. सध्या पोलीस सीसीटीव्ही फूटेज तसेच इतर माध्यमातून सुटकेस टाकणारा नेमका कोण आहे याचा शोध घेत आहेत.

Visit : policenama.com