home page top 1

ICC World Cup 2019 : ‘हा’ खेळाडू ठरणार ‘प्लेयर ऑफ द टूर्नामेंट” : ब्रेट ली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलिया आणि भारत यांनी सेमीफायनलमध्ये आपले स्थान पक्के केले असून उर्वरित संघ दोन स्थानांसाठी लढाई करताना दिसून येत आहेत. सध्या ऑस्ट्रेलिया १४ गुणांसह पहिल्या क्रमांकावर असून भारतीय संघ १३ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. या स्पर्धेत अनेक खेळाडू भन्नाट फॉर्ममध्ये आहेत. भारताचा रोहित शर्मा सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये पहिल्या क्रमांकावर असून ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क सर्वात जास्त बळी घेणाऱ्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे.

Image result for डेविड वॉर्नर

याचदरम्यान, ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू ब्रेट ली याने ‘प्लेयर ऑफ द टूर्नामेंट’ कोण होणार या विषयी भाष्य केले आहे. यावेळी बोलताना त्याने म्हटले कि, डेविड वॉर्नर सध्या उत्तम फॉर्ममध्ये असून तोच या स्पर्धेचा ‘प्लेयर ऑफ द टूर्नामेंट’ ठरेल. सर्व खेळाडूंना मागे सोडून तोच या स्पर्धेतील उत्तम खेळाडू ठरणार असल्याची आशा देखील त्याने व्यक्त केली.

पुढे बोलताना तो म्हणाला कि, त्याच्याकडे धावांची भूक दिसून येत आहे. त्याने खेळलेल्या शानदार खेळींमधून आणि फटक्यांमधून त्याची हि भूक दिसून येत आहे. त्याचप्रमाणे तो त्याची विकेट न गमावता आपल्या खेळामध्ये सुधारणा करतच आहे.

दरम्यान, या स्पर्धेत डेविड वॉर्नर याने आतापर्यंत खेळलेल्या ८ सामन्यांत ५१६ धावा केल्या असून सर्वात जास्त धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. या स्पर्धेतील त्याची सर्वोत्तम खेळी १६६ धावा आहेत.

बाळासाहेब आंबेडकर यांची मुंबईत आज पत्रकार परिषद ,विधानसभेबाबत करणार मोठा खुलासा

ताण-तणाव दूर करून आनंदी जीवन जगा, ५ सोप्या पद्धती

पोलिसाच्या घरातच चोरट्यांनी केला हात साफ

विविध रंगाच्या बाटल्यांमधील पाणी प्या, आरोग्य सुधारेल

सर्दीची ‘अ‍ॅलर्जी’ का होते ? जाणून घ्या यामागील कारणे

भरपावसात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन

Loading...
You might also like