ICC World Cup 2019 : धोनीनं आणखी वर्षभर खेळावं, श्रीलंकेच्या ‘या’ खेळाडूचं भाष्य

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताचा यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंग धोनी या वर्ल्डकप स्पर्धेत आपल्या संथ फलंदाजीने त्रस्त असून त्याच्यावर या प्रकरणी विविध स्तरातून टीका होत आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी अशी बातमी आली होती कि या वर्ल्डकप स्पर्धेनंतर महेंद्रसिंग धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करू शकतो. त्यानंतर आता श्रीलंकेचा वेवान गोलंदाज लसिथ मलिंगा याने धोनीच्या निवृत्तीवर भाष्य केले आहे. ३५ वर्षाच्या मलिंगाने धोनीला याविषयी सल्ला देताना म्हटले आहे कि, धोनी हा जगातील सर्वोत्तम फिनिशर असून युवा फलंदाज त्याच्या अनुभवाचा फायदा घेऊ शकतील.

आयएएनएसशी बोलताना मलिंगाने म्हटले कि, धोनीने आणखी एक ते दोन वर्ष खेळायला हवे. त्याने या मंचावर खेळण्यासाठी फिनिशरची भूमिका पार पडू शकतील असे खेळाडू तयार करायला हवेत. तो अजूनही जगातील सर्वोत्तम फिनिशर असून त्याची जागा कोणीही घेऊ शकत नाही. त्यामुळे युवा खेळाडूंनी त्याच्याकडे शिकायला हवे. त्याचबरोबर त्याने आपला मुंबई इंडियन्समधील सहकारी जसप्रीत बुमरा याचे देखील कौतुक केले. यावेळी कौतुक करताना तो म्हणाला कि, बुमरा भारतीय संघाच्या या वर्ल्डकप मोहिमेत फार मोलाची भूमिका बजावत आहे. बुमराने या स्पर्धेत आतापर्यंत ८ सामन्यात १४ विकेट घेतल्या आहेत. बुमराच्या बाबतीत सर्वात चांगली गोष्ट ही आहे कि, तो आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवतो आणि त्यामुळेच तो मोठ्या सामन्यांत दबावातून वर येत चांगली कामगिरी करतो.

दरम्यान, या वर्ल्डकप स्पर्धेत श्रीलंकेचे आव्हान संपुष्टात आले असून ते उद्या भारताविरुद्ध आपला शेवटचा साखळी सामना खेळणार आहेत.

‘नासलेलं दूध’ही आहे सौंदर्यवर्धक ; जाणून घ्या फायदे

Video : अभिनेत्री सनी लियोनीच्या सौंदर्याचं ‘राज’

तुमची त्वचा शुष्क आहे का? मग हे उपाय करून पाहा

फरार असलेले दिलीप तिडके अखेर लाचलुचपत अधिकाऱ्याच्या जाळ्यात

खुशखबर ! निवृत्तीचे वय वाढविण्याचा सरकारचा विचार

‘या’ पेयाचे नियमित सेवन करा आणि उत्तम आरोग्य मिळवा

सेल्युलाइटवर नियंत्रण मिळवायचे असेल तर करा ‘हे’ उपाय

काय सांगताय ! मेहंदी केवळ ‘सौंदर्यच’ नाही तर ‘आरोग्यही’ खुलवते

मेंदूलाही असते व्यायामाची गरज, मानसिक उर्जेसाठी आवश्यक

पावसाळ्यात घ्या अशी काळजी, अरोग्य राहील चांगले