शारीरिक संबंधानंतर खायला घालायचा ‘सायनाइड’ची गोळी, 20 महिलांचा घेतला ‘जीव’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशभरात ‘सायनाइड’ या नावाने ओळखला जाणाऱ्या कुख्यात मोहनला 19 बलात्कार आणि हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मोहनने सायनाइड खायला घालून 20 महिलांचा बलात्कार करुन त्यांची हत्या केली आहे.

मोहनची ओळख 23 वर्षीय तरुणीशी मंगळूरात एका CAMPCO यूनिटमध्ये काम करताना झाली होती. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली. मैत्री झाल्यानंतर मोहनने तरुणीसमोर विवाहाचा प्रस्ताव ठेवला. त्यानंतर त्याने तरुणीला 2 जानेवारी 2006 रोजी म्हैसूर बस स्डॅंड जवळील एका लॉजवर नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध बनवले. सकाळी तरुणीच्या अंगावरील सर्व दागिणे काढून लॉजमध्येच ठेवले आणि तिला घेऊन फिरायला जाण्यासाठी बस स्टॅंडवर आला. बस स्टॅंडवर मोहनने तरुणीला सायनाइड मिसळलेली गोळी खायला घातली जेणेकरुन ती गर्भवती होणार नाही.

तरुणीने ही गोळी खाल्ली तशी ती टॉयलेटच्या दिशेने पळाली आणि तेथेच पडली. जेव्हा तिला रुग्णालयात नेण्यात आले तेव्हा मृत घोषित करण्यात आले. मोहन पुन्हा लॉजवर गेला आणि सर्व दागिणे घेऊन फरार झाला. यानंतर मोहनला 2009 मध्ये कर्नाटकच्या बंतवालमध्ये अटक झाली. त्यावेळी त्याने 20 व्या महिलेचा बलात्कार केला होता आणि तिला सायनाइड खायला घालून तिची हत्या केली होती.