Cyber Crime News | धक्कादायक ! 19 वर्षाच्या पोराकडून तब्बल 50 हून अधिक शिक्षीका अन् मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त, पुढं झालं असं काही…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   Cyber Crime News | व्हॉट्सअपवर (Whatsapp) अश्लील मेसेज आणि सोशल मीडियावर (Social Media) मॉर्फ केलेले फोटो पाठवत शाळेतील मुलींना आणि शिक्षकांना त्रास देणाऱ्या १९ वर्षीय तरुणाला बेड्या ठोकण्यात दिल्ली सायबर पोलिसांना यश आले आहे. महावीर कुमार असं त्याच नाव असून दोन महिन्यापूर्वी पीडितांच्या तक्रारीवरुन पोलिसांच्या सायबर सेलने तपास सुरू केला होता. दरम्यान प्राथमिक तपासात महावीरनं ५० हून अधिक शिक्षिका आणि मुलींना निशाणा बनवलं होत अशी धक्कदायक माहिती समोर (Cyber Crime News) आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (IIT) खडगपूर येथे महावीर पदवीचे शिक्षण घेत होता.
एका शाळेतील मुलीसोबत महावीरचा सपंर्क झाला.
दोघामध्ये चांगली मैत्री झाली. त्या मुलीला महाविर पसंत करू लागला. त्यानंतर त्याने इन्स्टावरुन फेक आयडी बनवत त्या मुलीशी संपर्क साधला.
अश्लील फोटो पाठवून त्या मुलीला ब्लॅकमेल करण्यास महावीरने सुरुवात केली. मुलीकडून शिक्षकांचे नंबर्स घेतले आणि ऑनलाईन क्लासमध्ये वेबलिंक्स शेअर करू लागला.
त्याद्वारे ऑनलाइन क्लासच्या ग्रुपमध्ये अश्लील कन्टेंट शेअर करण्यास महावीरने सुरुवात केली. सुरुवातीला शाळेतीलच मुलांचे हे काम असल्याचा शिक्षकांचा समज झाला.
त्यामुळे काही विद्यार्थ्यावर कारवाई केली. पण हे प्रकार सुरूच राहिले त्यामुळे त्रासलेल्या शिक्षकांनी पोलिसांकडे धाव घेतली.
पोलिसांनी तपास सुरु करून पीडित मुली, शिक्षिका आणि पालक यांच्याशी संपर्क साधून ५ फेक इन्स्टाग्राम (Instagram)अकाऊंट, फेक कॉलर आयडी आणि ३३ व्हॉट्सअप नंबर शोधले.
त्यानंतर आयपी अँड्रेसच्या माध्यमातून महावीरची ओळख पटवण्यात दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलला (Cyber Crime News) यश मिळाले.

 

केवळ मजेसाठी महावीरने केले कृत्य

महावीरला पटना येथे अटक केल्यानंतर तपासात अनेक धक्कदायक माहिती समोर आल्याचे डीसीपींनी सांगितले. तीन वर्षांपूर्वी पीडितेला एका नंबरवरून फोन आला होता.
त्या नंबरवर बनलेल्या प्रोफाईल्समधून महावीरने त्या मुलीची निवड केली. स्वतःची ओळख लपवण्यासाठी महावीरने कॉलवर आवाज बदलणाऱ्या अँपचा वापर केला.
त्यामुळे त्याची ओळख पटणे अशक्य झाले. अँपच्याच माध्यमातून त्याने पीडितांचे फोटो न्यूड करत मॉर्फ करण्यास सुरुवात केली.
महावीरांच्या मोबाईलमध्ये अनेक अश्लील व्हिडीओ तसेच फोटो पोलिसांना आढळून आले आहेत.
महत्त्वाचे म्हणजे महावीरने या माध्यमातून पैसे घेतले नसून केवळ मजेसाठी हा उद्योग केल्याची कबुली त्याने दिली आहे.
पोलिसांनी आर्थिक व्यवहार झाल्याचे तपासले असता तशी कोणतीही माहिती समोर आली नाही. एक मुलगी महाविरला आवडत होती.
पण त्यानंतर त्याने आणखी मुलींचा शोध घेण्यासाठी इन्स्टाग्रामवर फेक आयडी बनवण्यास सुरुवात केल्याचेही तपासात समोर आले.

 

Web Title : Cyber ​​Crime News | Shocking ! The lives of more than 50 teachers and girls have been ruined by a 19-year-old boy, delhi police arrest 19 years old youth in cyber crime case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Nilesh Rane | ‘साखरेच्या नावावर महाराष्ट्राला लुटलं, तिच साखर पवार कुटुंबाला संपवणार’, निलेश राणेंची टीका

Pune Crime | व्यावसायिकाची 97 लाखाची रोकड चोरणारी दुकली गजाआड; पुणे व नगर पोलिसांची संयुक्त कारवाई

ACB Trap on Sujata Patil | वरिष्ठ पोलिस अधिकारी सुजाता पाटील लाच प्रकरणी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात