Cyber Security Tips | कोरोना काळात Cyber Fraud मध्ये वाढ, कसा करायचा बचाव; जाणून घ्या 15 सायबर सुरक्षा टिप्स

पोलीसनामा ऑनलाइन टीम (Policenama online) – Cyber Security Tips | कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या (lockdown) काळात मोबाईल, लॅपटॉपचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या गोष्टीचा फायदा सायबर गुन्हेगार घेत असून, अनेकांची फसवणूक झाल्याचे प्रकार उघडकीस आले आहे. लॉकडाऊन काळात सायबर गुन्ह्यामध्ये (cyber crime) मोठी वाढ झाली आहे. मोबाईल, कॉम्प्युटर, लॅपटॉप आणि इतर गॅजेट इंटरनेटशी जोडले गेल्याने सायबर गुन्हेगार तुमच्यापर्यंत सहज पोहचू शकतात. यापासून बचाव करण्यासाठी जाणून घ्या या 15 सायबर सुरक्षा टिप्स (Cyber Security Tips).

1. सायबर विश्वात वावरताना अनोळखी व्यक्तीवर लगेच विश्वास ठेऊ नका. फेसबुक (Facebook), व्हाट्सअ‍ॅप (WhatsApp) व इतर माध्यमाचा वापर करून सायबर अपराधी आपणांस अमिष दाखवून लुटतात.

2. इंटरनेट वर आपले सर्व डिटेल्स अपलोड करू नका. फॅमिली फोटोज, व इतर वैयक्तिक माहिती शेअर केल्याने आपण सायबर क्रिमिनलला सहज बळी पडू शकता. बँकेशी संलग्न मोबाईल नंबर, आधारकार्ड आपला पत्ता अशी माहिती शेअर करू नये. आपल्या कौटुंबिक व वैयक्तिक माहिती फेसबुक व इंस्टाग्राम (Instagram) सारख्या सोशल मीडियावर शेअर करू नये.

3. आपला OTP इतरांसोबत शेअर करू नये. बँक अधिकारी बोलत आहे, आपले डेबिट कार्ड बंद होणार आहे, सिम कार्ड बंद होणार आहे तर आपल्या मोबाईल वर एक OTP आला असेल तो शेअर करा असा कोणाचा कॉल आला तर त्यावर विश्वास ठेऊ नका. बँक कधीच OTP मागत नाही.

 

Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

4. फिशिंग वेबसाईट लिंक्स वर आपण क्लिक करू नये. रोजगार भत्ता, प्रधानमंत्री योजना व जॉब संदर्भामध्ये जर टेक्स्ट मेसेज, ई-मेल द्वारे अशा लिंक्स, वेबसाईट्स प्राप्त झालेल्या असतील तर त्यावर क्लिक करू नये. आपला मोबाईल, कॉम्प्युटर हॅक होण्याची शक्यता असते.

5. AnyDesk, TeamViewer, QuickSupport असे अँप्स कोणाच्याही सांगण्यावरून आपल्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करू नका.

6. QR Code स्कॅन करून कुणी आपणांस पैसे देऊ केल्यास आपण चुकुनही Gpay ची PIN टाकु नये. पैसे रिसिव्ह करण्यासाठी कधीच QR Code स्कॅन केला जात नसतो. बँकेचा ऑनलाईन व्यवहार करत असताना अशा प्रकारचे सर्व मेसेजेस काळजीपूर्वक वाचूनच पुढे अंमल करा.

7. अनोळखी मोबाईल नंबरवरुन व्हाट्सअ‍ॅपवर व्हिडिओ कॉल आल्यास आपण तो स्विकारू नये. आजकाल हा न्युड विडिओ कॉलचा प्रकार खुप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कोणीतरी मुलींचा डीपीला फोटो वापरून हे धोकेबाज लोकांना रात्री बेरात्री कॉल करतात आणि त्यांच्या कॉम्पुटर, लॅपटॉप वर शुट केलेला एखाद्या मुलीचा नग्न विडिओ दाखवतात आणि आपणासही तसे करायला भाग पडतात व तिकडे आपला विडिओ रेकॉर्ड करून आपणास ब्लॅकमेल केले जाते.

8. आपल्या प्रत्येक अकाउंट प्रोफाईल ला Two Factor Authentication सिस्टम कार्यान्वित करावे. त्यामुळे तुमचे अकाउंट सुरक्षित राहते.

9. आपल्या स्मार्ट फोनचा वापर नसल्यास मोबाईल इंटरनेट डेटा बंद करून ठेवावा. आपल्या मोबाईलला इंटरनेट जोडला गेल्या असल्याने सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.

10. लहान मुलांकडे आपला मोबाईल देत असाल तर त्यावर लक्ष ठेवावे. जेणेकरून त्यांच्या हातून ऑनलाईन वर्ल्डमध्ये अजाणतेपणाने कोणती चूक होणार नाही.

 

Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

11. Child Porn पाहणे व शेअर करणे कायद्याने IT Act 2000 अन्वये गुन्हा आहे, त्यामुळे असे कृत्य कुणीही करू नये.

12. आपल्या मोबाईल ऑटो लॉक असणे गरजेचे आहे. आणि स्ट्रँग पासवर्ड पिनकोड ठेवावा.

13. आपला मोबाईल हरवल्यास जवळच्या पोलीस स्टेशनला व बँकेशी संपर्क साधावा. त्यामुळे होणाऱ्या संभाव्य धोक्यापासून आपला बचाव होईल.

14. ऑनलाईन कस्टरमर सपोर्टचा गुगलमध्ये संपर्क शोधताना अधिकृत वेबसाईट वरुनच माहितीचा वापर करावा.

15. आपल्या ई-मेलचा व इतर अकाऊंटचा पासवर्ड कुणी गेस करेल असा ठेऊ नये. उदा. मोबाईल नंबर, नाव, जन्मतारीख वगैरे.

– ऍड. प्रेमसागर गवळी,  मोबा. 7710932406

पुणे ऑफिस – ऑफिस नं. 202, व्हिजन 9 मॉल, पिंपळे सौदागर, पुणे – 411061

मुंबई ऑफिस – ऑफिस नं. डी- 414, विष्णु ऑफिस प्रिमायसेस, वाशी कोर्ट जवळ, सेक्टर – १५, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई – 400614

Web Title :- Cyber ​​Security Tips | The rise in cyber fraud during the Corona period, how to defend; Learn 15 Cyber ​​Security Tips

Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Viral Video | लग्नात वधूला मिठाईच्या बॉक्समध्ये मिळाले असे गिफ्ट, पाहताच बदलला चेहर्‍याचा रंग, पहा मजेदार व्हिडीओ

Pune News | शेरेबाजी करण्यापेक्षा पाटील यांनी रखडलेले प्रकल्प मार्गी लावावेत – माजी आमदार मोहन जोशी

फायद्याची गोष्ट ! मुलांसाठी ‘या’ बँकेनं ने सुरू केली विशेष सुविधा, राहणार नाही भविष्याची चिंता; होईल मोठा फायदा

Nitesh Rane | व्यासपीठावरील शिवसेना नेत्यासमोर नितेश राणेंचे युतीबद्दल वक्तव्य