फेसबुकवर सायबर हल्ला ५ कोटी अकाउंट हॅक

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था

फेसबुकची ५ कोटी अकाऊंट हॅक झाली आहेत.फेसबुकच्या View as या सुविधेच्या सुरक्षेतील उणीवांचा गैरफायदा घेत हॅकर्सने फेसबुक अकाऊंट हॅक केल्याची माहिती खुद्द कंपनीचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी दिली.हॅक झालेली पाच कोटी अकाऊंट नेमकी कोणत्या देशातील आहेत हे मात्र फेसबुककडून जाहीर करण्यात आलेलं नाही. हा सर्व प्रकार २५ सप्टेंबरला फेसबुकच्या लक्षात आला आहे. फेसबुकने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. तसेच या प्रकरणी फेसबुकने माफी मागितली आहे.

फेसबुकच्या विशिष्ट कोडमध्ये बदल करून हॅकर्सनी वापरकर्त्यांची माहिती चोरल्याचे उघड झाले आहे. फेसबुकने या प्रकरणी अंमलबजावणी अधिकाऱ्यांना याची तक्रार दिली आहे. तसेच या कोडमध्ये दुरुस्ती केली आहे.फेसबुकने वर्षभरापूर्वी view as हे फिचर सुरू केलं होतं. या फिचरच्या सुरक्षेमध्ये असलेले दोष हेरून हॅकर्सने ५ कोटी अकाऊंटमध्ये प्रवेश केल्याचं फेसबुकच्या निदर्शनास आलं. त्यावर फेसबुककडून तातडीने उपययोजना देखील करण्यात आली आहे. सुरक्षेचा विचार करून फेसबुकने ‘View As’ हे फिचर काढून टाकले आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0059c843-c3b9-11e8-a59c-c1cbc23b5484′]

हॅकर्सकडून युजर्सच्या अकाऊंटचा गैरवापर झाला आहे की नाही हे अद्याप कळू शकलेलं नाही. पण निर्माण झालेली समस्या गंभीर असल्याचं फेसबुककडून सांगण्यात आलं आहे. ज्या युझर्सना फेसबुक लॉग ईन करताना अडचण येत असेल त्या युझर्सने फेसबुकच्या हेल्प सेंटर आणि सिक्यूरिटी अँड लॉग ईन ला भेट देण्याचे आवाहन केले आहे.फेसबुकने या हल्ल्यापासून होणारे नुकसान कमी करण्यासाठी शुक्रवारी सकाळी जवळपास ९ कोटी युजर्सना अकाउंट लॉगआऊट करण्यास भाग पाडले होते. हा सायबर हल्ला कोठून झाला याबाबत फेसबुक सध्या शोध घेत आहे. तसेच युजर्सनं पासवर्ड बदलण्याची गरज नसल्याचंही स्पष्ट केलं आहे.

[amazon_link asins=’B077RTXJ66,B01G5I8YLC’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’20e255cf-c3b9-11e8-b421-b945daf7741b’]

केंब्रिज अॅनालिटीकाच्या डेटा चोरी प्रकरणानंतर फेसबुक चांगलंच वादात सापडलं होते. हे प्रकरण शांत होते ना होते तोच फेसबुकसमोर आणखी एक मोठी अडचण उभी राहिली आहे. ५ कोटी फेसबुक अकाउंटची माहिती लीक झाली आहे.

क्रिकेटच्या सामन्यावर सट्टा घेणारा पोलिसांच्या जाळ्यात

आशिया क्रिकेट स्पर्धेला प्रेक्षकांचा फारसा पाठिंबा मिळाला नसला तरी सट्टाबाजांमध्ये चालती होती. शुक्रवारी रात्री झालेल्या भारत विरुद्ध बांगला देश यांच्यातील सामन्यात देशभरात मोठ्या प्रमाणावर सट्टा लावण्यात आला होता, असे बोलले जात असतानाच अकोला येथील राधाकिसन प्लॉटमध्ये चाललेल्या सट्ट्यावर पोलिसांनी छापा टाकून एकाला अटक केली आहे. महेश महावीरप्रसाद अग्रवाल (वय ४७, रा. न्यू राधाकिसन प्लॉट) असे त्याचे नाव असून त्याच्याकडून ३६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

[amazon_link asins=’B06ZZB71TB,B079GXD2WB’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b26aff22-c3ba-11e8-9a3f-8100b1fb095f’]