वाशीतील एमजीएम रुग्णालयावर सायबर हल्ला

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन 

वाशीतील एमजीएम रुग्णालयातल्या संगणक प्रणालीवर सायबर हल्ला करण्यात आला असून हॅकर्सने तिथली संगणकीय यंत्रणा ठप्प करून बिट कॉइन स्वरूपात खंडणीची मागणी केली आहे. या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

[amazon_link asins=’B01HQ3PHVU’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b367f22b-8a3a-11e8-95c9-cb94eb59de17′]

वाशीतील एमजीएम रुग्णालयातील संगणक प्रणाली रविवारी रात्री अचानकपणे ठप्प होऊ लागली. काही वेळातच हा सायबर हल्ला असल्याचे रुग्णालय प्रशासनाच्या निदर्शनास आले. अज्ञात व्यक्तीने तिथली संपूर्ण संगणकीय यंत्रणा ठप्प करून सायबर हल्ला झाल्याचे संदेश संगणकावर दिले, तसेच या हल्ल्यातून सुटकेसाठी खंडणीचीही मागणी केली. याकरिता त्याने स्वत:चा ईमेल आयडीही दिलेला आहे, त्यानुसार रुग्णालयाच्या वतीने गुन्हे शाखेच्या सायबर सेलकडे तक्रार देण्यात आलेली आहे.

हा सायबर हल्ला रुग्णालयाच्या संगणकीय प्रणालीच्या सुरक्षेतील त्रुटीमुळे झाल्याची शक्यता गुन्हे शाखा उपआयुक्त तुषार दोशी यांनी वर्तवली आहे, तर हॅकरने खंडणीच्या रकमेचा उल्लेख केलेला नसून केवळ बिट कॉइन स्वरूपात खंडणीची मागणी केलेली आहे, त्याकरिता संपकार्साठी दिलेल्या ईमेल आयडीच्या आधारे हॅकरचा शोध सुरू असल्याचे दोशी यांनी सांगितले.

गेल्या वर्षी शहरात झालेल्या सर्वात मोठ्या सायबर हल्ल्यात जेएनपीटीच्या एका बंदरातील संपूर्ण संगणकीय यंत्रणा काही दिवसांकरिता ठप्प झाली होती. संबंधिताने बीटक्राईनच्या स्वरूपात खंडणीची मागणी केली होती. त्यानंतर काही दिवसांतच नवी मुंबई पोलिसांचे संकेतस्थळच हॅक झाल्याचा प्रकार घडला होता. यामुळे आॅनलाइन संगणकीय प्रणालीवर आधारित उद्योग व्यावसायिकांपुढे आधुनिक गुन्हेगारी पद्धतीचे संकट निर्माण झाले आहे.